MUMBAI | साकीनाका परिसरातील बांबू गल्लीत भीषण आग

MUMBAI | साकीनाका परिसरातील बांबू गल्लीत भीषण आग

मुंबईतल्या साकीनाका भागातील खैरानी रोडजवळ असलेल्या थिनर कंपनीला भीष आग लागली. या आगीत परिसरातील वीस ते पंचवीस गाळे जळून खाक झाल्याची माहिती मिळतेय. या परिसरात वायर, भंगार, गोणी, प्लॅस्टीक आणि फर्निचरची मोठ्या प्रमाणात गोदामं आहेत.

आग लागलेला परिसर चिंचोळा परिसर आहे. थिनर मुळात ज्वलनशील असल्याने आग मोठ्या प्रमाणावर लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय. दरम्यान या आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न अग्निशमन दलाकडून करण्यात येतायत. घटनास्थळी तब्बल अग्निशमन दलाच्या 20 गाड्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करतायत.      

मुंबईतील भीषण अग्निकांड 

  • कुर्ला पश्‍चिम येथील सीएसएमटी रस्त्यावरील कपाडीया नगरच्या रद्दी सामानाला आग, 25 गोदामाना जळून खाक गॅस 
  • सीएसएमटी - मशिद स्थानकाजवळील झोपडपट्टीला भीषण आग लागली. या आगीमुळे काही वेळ रेल्वे गाड्याही थांबवण्यात आल्या. या आगीत सहा ते सात मुले जखमी झाली. 
  • गिरगावातल्या काकडवाडीत आग लागली. येथे तळमजल्यातील लॉंड्रीतल्या कपड्यांनी पेट घेतला (सकाळी) ही आग पहिल्या मजल्यापर्यंत गेली व त्यात एका कुटुंबातील दोघं जखमी झाली तर एकाचा मृत्यू झाला. 
  • नायर रुग्णालयातील ईएनटी विभागाच्या इमारतीला शॉर्टसर्किटमुळे भर दुपारी मोठी आग लागली. ती विझवायला तीन तासाहून अधिक वेळ लागला. या आगीत विद्युत यंत्रणांचे नुकसान झाले. 
  • चेंबुरच्या आर के स्टुडीओत दोन सेट जळून खाक झाले. येथे आग विझवणारी अग्निशमन यंत्रणा काम करीत नव्हती. यावेळी चित्रीकरण नसल्याने मोठी दुर्घटनाटऴली. 
  • विलेपार्ले येथील सागर ज्योती इमारतीत आग लागली. या आगीत काहीजण जखमी झाले. 
  • जवाहरव्दीप व बुचर बेटावरच्या बीपीसीएल टाकीवर वीज पडून मोठी आग लागली. 30 हजार मेट्रिक टनाच्या टाकीत हायस्पीड डिझेल ठेवलेले होत, ते जळालं. 
  • वांद्रे पूर्व येथील गरीब नगर- बेहराम पाडा झोपडपट्टीला दुपारच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत अनेक झोपड्या जळून खाक झाल्या. यांत तीघे जखमी झाले आहेत. 
  • दोन महिन्यांपूर्वी विलेपार्ले येथील सागर ज्योती या इमारतीत भीषण आग लागली. ही आग विझवताना एक जवान जखमी झाला. 
  • वर्ष संपता संपता साकीनाका खैरानी रोडवरील भानू फरसाण दुकानाला लागलेल्या भीषण आगीत आज 12 कामगार होरपळून ठार झाले. 
  • कमला मिल दुर्घटना 14 जणांचा मृत्यू 
  • अंधेरी कामगार रुग्णालयात लागलेली आग,यात सहा ज्यांचा मृत्यू झाला होता 
  • एमटीएन मधील भीषण आग, यात 84 जणांना सुखरूप वाचवण्यात यश. 

आज संध्याकाळी सहा वाजता ही आग लागली. सुदैवाची गोष्ट म्हणजे या आगीत कोणतीही जीवित हानी झालेली नाही. मात्र या आगीचा मोठा फटका इथल्या व्यापाऱ्यांना बसलाय. याचसोबत या आगीच्या धुरांच्या लोटांमुळे मुंबई विमानतळांवरील उड्डाणे वीस ते पंचवीस मिनिटे उशिराने होतायत.  

Web Title: massive fire in bamboo gully of sakinaka air traffic affected due to smog

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com