फडणवीसांच्या राजीनाम्यानंतर सोशल मीडियावर 'Meme's चा धुमाकूळ...

Devendra Fadnavis, Uddhav Thackeray , Sharad Pawar
Devendra Fadnavis, Uddhav Thackeray , Sharad Pawar

(सौजन्य : सोशल मीडिया)

पुणे : महाराष्ट्राचं राजकारण पाहून भले भले थकतील. विधानसभा निवडणूकीचा निकाल लागल्यापासूनच हे सत्तानाट्य सुरू झाले. मुख्यमंत्रीपद, समसमान फॉर्म्यूला, महाविकासआघाडी, बहुमत चाचणी असे अनेक शब्द या काळात कानावर पडले. कधी कोण कोणाला पाठिंबा देईल आणि कधी कोणता पक्ष दुसऱ्या पक्षाशी आघाडी करेल याचा अंदाज बांधता येत नव्हता. या सगळ्यातून मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेल्या फडणवीसांनी आज राजीनामा दिला आणि सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस पडला. 

 महाराष्ट्रातील सध्याची राजकीय परिस्थिती एखाद्या सिनेमाच्या कहाणी प्रमाणेच आहे. पाहूया आजचा गमतीशीर राजकीय घटनाक्रम . . Today was the most happening day in Maharashtra politics. Here's a refreshing timeline of the the entire series of events. . . #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar#uddhavthackeray #bjp #ncp #shivsena #news #sakal #sakalnews #viral #viralnews #viralmemes #viralphoto #viralphotos

A post shared by Sakal News (@sakalmedia) on Nov 26, 2019 at 4:20am PST

भाजपच्या अमित शहांना चाणक्य म्हणले जाते, पण महाविकासआघाडीच्या सत्तानाट्यामुळे सगळी सत्तासमीकरणेच बदलून गेली. त्यात 'मी पुन्हा येईन' म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन पुन्हा राजीनामा द्यावा लागल्याने सोशल मीडियात प्रचंड ट्रोल केले जात आहे.

तर अजित पवारांनीही उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन व राष्ट्रवादीची नाराजी पत्करत आज राजीनामा दिल्याने त्यांनाही ट्रोल केले जात आहे. 

नेटकऱ्यांची क्रिएटीव्हीटी आणि डोकं चालवण्याची पद्धत बघून सोशल मीडियावर त्यांचे कौतुक होत आहे.    


Web Title: memes getting viral after resignation of Devendra Fadnavis from CM post

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com