BREAKING | शिवसेना आमदारांची संख्या वाढली; बच्चू कडू यांचा सेनेला पाठिंबा

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 27 ऑक्टोबर 2019

मुंबई : प्रहार जनशक्ती पक्षाचे एकमेव आमदार बच्चू कडू यांनी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला आहे. तसेच आमदार राजकुमार पटेल यांनीही पाठिंबा दिल्याने शिवसेनेच्या आमदारांची संख्या आता 56 वरून 60 झाली आहे.

उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेऊन बच्चू कडू यांनी पाठिंबा दिला. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आमदार बचू कडू आणि आमदार राजकुमार पटेल यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.  

शेतातील पेरणी ते कापणी पर्यंतची कामे रोहयोमधून करणे, दिव्यांग आणि आदिवासी बांधवांच्या योजनांची अंमलबजावणी आणि अचलपूर व मेळघाट मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न सोडवण्याच्या मुद्द्यांवर कडू यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या, आदिवासींच्या, शेतकऱ्यांच्या, मजुरांच्या, दिव्यांग्य बांधवांच्या प्रश्नांवर प्रहार आणि शिवसेनेची वैचारिक भूमिका समान असल्याने शिवसेनेला पाठिंबा देत असल्याचे त्यांनी सांगितले. 

प्रहारचे संस्थापक आमदार बचू कडू (अचलपूर) आणि आमदार राजकुमार पटेल (मेळघाट) येथून निवडून आले आहेत. प्रहार जनशक्ती पक्ष संपूर्ण ताकतीने शिवसेनेच्यासोबत राहणार असल्याची ग्वाही कडू यांनी दिली.

Web Title: MLA Bacchu Kadu supports to Shivsena after Maharashtra Vidhan Sabha 2019

संबंधित बातम्या

Saam TV Live