चीनला आणखी एक मोठा दणका, मुंबईतील मोनोरेलचं कंत्राटही रद्द

साम टीव्ही
शुक्रवार, 19 जून 2020
  •  
  • चीनला आणखी एक मोठा दणका
  • मुंबईतील मोनोरेलचं कंत्राटही रद्द
  • चिनी कंपन्यांचं मोठं आर्थिक नुकसान 

भारत-चीन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारतानं पहिला घाव घालत चीनची आर्थिक नाकेबंदी करायला सुरूवात केलीय. आता चीनच्या हातून आणखी एक मोठं कंत्राट गेलंय. त्यामुळे चीनचं मोठं आर्थिक नुकसान होणारंय. कोणतं आहे हे कंत्राट, पाहा...

चीनने भारताशी लडाख सीमेवर गलवान खोऱ्यात आगळीक केल्यानंतर संपूर्ण भारतातून तीव्र प्रतिक्रिया उमटताना पाहायला मिळतायत. वेळ आली तर सीमेवर भारतीय सैनिक बुलेटनं चिनी सैनिकांशी दोन हात करतीलच मात्र आपण त्यापूर्वीच भारतानं चीनचा आर्थिक कणा मोडायला सुरूवात केलीय. याचीही प्रचिती आता येण्यास सुरवात झालीये. अनेकाकांकडून बॉयकॉट चीनचा नारा दिला जातोय. याच पार्श्वभूमीवर भारतानं चीनला आणखी एन मोठा दणका दिलाय. मुंबईतील मोनोरेलसाठीचं चिनी कंपनीला दिलेलं अंतिम टप्प्यातील कंत्राट MMRDA नं रद्द केलंय. मुंबई मोनोरेल रॅकसाठी दोन चिनी कंपन्यांना दिलेलं कंत्राट अंतिम टप्प्यात होतं. आता हे कंत्राट रद्द झाल्यात जमा आहे.

मुंबईतील महत्त्वाच्या अशा मोनो रेल प्रकल्पासाठी 10 मोनोरेलचे रॅक्स तयार करायचे होते. याशिवाय त्याचं डिझायनिंग आणि कमिशनिंग हे सर्व काम दोन चिनी कंपन्यांना देण्यात येणार होतं. हे कंत्राट अंतिम टप्प्यात होतं. आता हे कंत्राट भारतीय कंपन्यांना दिलं जाऊ शकतं. यामध्ये BHEL आणि BEML या कंपन्यांची नावं चर्चेत आहेत.

आधी दिल्ली-मेरठ रेल्वेचं काम त्यानंतर रेल्वेच्या सिग्नलिंग सिस्टमचं कंत्राट आणि BSNL MTNL मधील चिनी उपकरणांच्या वापरावर बंदी घालत भारताने चीनची आर्थिक नाकेबंदी केली. आता मोनो रेलच्या माध्यमातून भारतानं चीनला आणखी एक दणका दिलाय. आता वेळ आलीय ती सर्वांनी मिळून चीनला भारतीय बाजरपेठेतून कायमचं हद्दपार करण्याची. 


संबंधित बातम्या

Saam TV Live