गृहनिर्माण क्षेत्रातील मंदीचं सावट कायम 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 4 ऑक्टोबर 2018

एकीकडे म्हाडा आणि सिडकोच्या परवडणाऱ्या घरांना विक्रमी प्रतिसाद मिळतोय. तर दुसरीकडे एमएमआर भागात खासगी विकासकांनी बांधलेली टू बीएचकेपेक्षा मोठ्या आकाराची एक कोटीहून अधिक किमतीची अडीच लाखांहून अधिक घरं विक्रीविना पडून असल्याची माहिती समोर आली आहे.

एवढ्या मोठ्या प्रमाणात पडून असलेल्या घरांमागे महागाई हे मुख्य कारण असल्याचं समजतंय. त्याचबरोबर एकूण किमतीवर आकारली जाणारी सात टक्के स्टॅम्प ड्युटी आणि 12 टक्के जीएसटीमुळे घराच्या किमतीपेक्षा, तब्बल 19 टक्के अधिक किंमत मोजावी लागत असल्याने घर खरेदीकडे ग्राहकांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे गृहनिर्माण क्षेत्रावरील मंदीचं सावट अद्यापही दूर हटलेलं नाही.

WebTitle : marathi news mumbai more than two and half lakhs houses are empty 

संबंधित बातम्या

Saam TV Live