अजित पवार पुन्हा उपमुख्यमंत्री? अमोल कोल्हेंचे संकेत

Ajit Pawar, Amol Kolhe
Ajit Pawar, Amol Kolhe

पुणे : पहिल्यांदा खासदार होऊनही संसदेत सभागृहात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इम्प्रेस करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) खासदार डॉ. अमोल कोल्हे (mp amol kolhe) यांच्या एका फेसबुक पोस्टची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावरील टीव्ही मालिकांच्या माध्यमातून डॉ. अमोल कोल्हे घराघरांत पोहोचले आणि पुणे जिल्ह्यातील शिरूर लोकसभा मतदारसंघातून निवडून आले. येत्या 18 डिसेंबरला ते मोठी घोषणा करण्याच्या तयारीत आहेत. ते नेमकी कोणती घोषणा करणार याची उत्सुकता लागली आहे. 

उत्सुकता शिगेला!
लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्या सारख्या अनुभवी नेत्याला पराभूत केल्यानं डॉ. अमोल कोल्हे राजकीय क्षेत्रात चर्चेला आले. आपल्या वक्तृत्वशैलीनं त्यांनी लोकसभा निवडणूक तर गाजवलीच पण, विधानसभा निवडणुकीतही ते राष्ट्रवादी काँग्रेसचा हुकमी एक्का ठरले. संपूर्ण महाराष्ट्रात त्यांच्या जाहीर सभांना मागणी होती. त्यांनी अक्षरशः महाराष्ट्र पिंजून काढला. डॉ. अमोल कोल्हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतात फडणवीस सरकारने महाराष्ट्रातील गड किल्ल्यांवर हॉटेल्स उभारण्याचा प्रस्ताव दिल्यानंतर खासदार कोल्हे यांनी तातडीने त्याची दखल घेत. प्रवासातच व्हिडिओवरून प्रतिक्रिया देत फडणवीस सरकारवर टीका केली होती. आता हेच डॉ. कोल्हे येत्या 18 डिसेंबरला मोठी घोषणा करण्याच्या तयारीत आहेत. खासदार कोल्हे कोणती घोषणा पकरणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 


काय आहेत प्रतिक्रिया? 
डॉ. अमोल कोल्हे कोणती घोषणा करणार यावर उत्सुकता असल्यानं त्यांच्या पोस्टवर खूप मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया आल्या आहेत. कोणी शिवनेरीवर शिवसृष्टीची घोषणा करणार का?, असा प्रश्न विचारलाय तर कोणी, तुम्ही दिलेली आश्वासनं पूर्ण कराल, अशी अपेक्षा व्यक्त केलीय. डॉ. कोल्हे यांनी लोकसभेत बैलगाडी शर्यत पुन्हा सुरू करण्याची मागणी लावून धरली आहे. त्याविषयी ते घोषणा करतील, अशी शक्यता एकाने व्यक्त केलीय. 

Web Title: mp amol kolhe social media post big announcement on 18th december

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com