VIDEO | 'मी पुन्हा येईन' यावरून संजय राऊत यांची फडणवीसांवर टीका

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2019

मुंबई : 'महाआघाडी सरकारसाठी किमान समान कार्यक्रमावर काम सुरू आहे. मुख्यमंत्री शिवसेनेचाच व्हावा, तसेच 5 काय 25 वर्षे मुख्यमंत्री शिवसेनेचा व्हावा. बोलणी सुरू आहेत, त्यामुळे कोणीही फॉर्म्यूलाची चिंता करू नये.' असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज (ता. 15) पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच आम्ही, 'पुन्हा येईन, पुन्हा येईन' असेही म्हणत नाही, असे सांगत राऊतांनी फडणवीसांना टोला लगावला आहे.

मुंबई : 'महाआघाडी सरकारसाठी किमान समान कार्यक्रमावर काम सुरू आहे. मुख्यमंत्री शिवसेनेचाच व्हावा, तसेच 5 काय 25 वर्षे मुख्यमंत्री शिवसेनेचा व्हावा. बोलणी सुरू आहेत, त्यामुळे कोणीही फॉर्म्यूलाची चिंता करू नये.' असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज (ता. 15) पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच आम्ही, 'पुन्हा येईन, पुन्हा येईन' असेही म्हणत नाही, असे सांगत राऊतांनी फडणवीसांना टोला लगावला आहे.

'मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल असा आमचा आग्रह आहे, महाराष्ट्राला नेतृत्व शिवसेनाच देणार. आम्हाला कोणी अडवू शकत नाही. लाख प्रयत्न करा, मुख्यमंत्री तर शिवसेनेचाच होणार. मात्र आम्ही कायम सत्तेत राहू, येत-जात राहणार नाही.' असेही राऊत यांनी यावेळी सांगितले. आघाडीशी आमची किमान समान कार्यक्रमावर चर्चा सुरू आहे. त्यामुळे आमच्या फॉर्म्यूलाची कोणी चिंता करू नये, असेही त्यांनी यावेळी सांगितले. 

पवारांच्या पुलोद सरकारमध्येही भाजपचे लोक होते. त्यामुळे यापूर्वीही अनेक वेळा किमान समान कार्यक्रमावर सरकार स्थापन झाले आहे. वाजपेयींच्या सरकारमध्येही अनेक वेगवेगळ्या विचारधारेची लोक होती. जनतेचे, सरकारचे भले करण्यासाठी आम्ही सरकार स्थापन करणार आहोत, असे राऊतांनी यावेळी सांगितले. 

'बातम्या पसरवणाऱ्यांचे स्त्रोत आम्हाला माहिती आहेत. ज्यांच्याकडे बहुमत नाही त्यांनी राष्ट्रपती राजवट लादलीच आहे. त्यामुळे त्यांनी आमच्या फॉर्म्यूलाची चिंता करू नये, असेही राऊत यांनी यावेळी सांगितले. आज संजय राऊत यांचा वाढदिवस आहे. आजही त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपले विचार माध्यमांसमोर मांडले. 

 

संजय राऊत म्हणतात, 'बन्दे है हम उसके....'
संजय राऊत यांनी आज ट्विट करताना म्हणलं आहे की, 'बन्दे है हम उसके हमपर किसका जोर, उम्मीदों के सूरज निकले चारो ओर'. हे गाणे 'धूम 3' या चित्रपटातले असून आदित्य चोप्रांनी लिहिले आहे. या ट्विटवरून अजूनही त्यांना सत्तास्थापनेबाबत सकारात्मकता आहे, असे लक्षात येते. एका पत्रकार परिषदेत त्यांना या दररोजच्या ट्विटबद्दल विचारले असता, त्यांनी सांगितले की, हिंदीतील अनेक कवी माझ्या आवडीचे आहेत. त्यांच्या मला पटणाऱ्या काही ओळी मी दररोज ट्विट करतो. यातून कोणाला काही संदेश पोहोटविण्याचा हेतू नाही. त्यांनी असे स्पष्टीकरण दिले असले, तरी त्यांचे रोजचे ट्विट हे भाजपला टोला लगावणारे असते.

No photo description available.

Web Title: MP Shivsena Sanjay Raut speaks at PC about Governemnet Formation with NCP and INC


संबंधित बातम्या

Saam TV Live