Murder Mystery | एका शर्टमुळे मर्डर मिस्ट्री उलगडली...

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 8 डिसेंबर 2019

माहीममध्ये एका सूटकेसमध्ये सापडलेल्या मानवी अवयवांचं गूढ आता उलगडलंय. दत्तक घेतलेल्या तरुणीनंच वयोवृद्धाची क्रूरपणे हत्या करून त्याच्या मृतदेहाचे तुकडे केले आणि तीन सुटकेसमध्ये भरून ते फेकून दिले.

माहीममध्ये एका सूटकेसमध्ये सापडलेल्या मानवी अवयवांचं गूढ आता उलगडलंय. दत्तक घेतलेल्या तरुणीनंच वयोवृद्धाची क्रूरपणे हत्या करून त्याच्या मृतदेहाचे तुकडे केले आणि तीन सुटकेसमध्ये भरून ते फेकून दिले.

पोलिसांच्या चाणाक्ष बुद्धीनं या हत्याकांडाचा प्रचंड वेगानं तपास करून या तरुणीला आणि तिच्या प्रियकराला अटकही केलीय. पोलिसांसमोर कोणताही क्लू नसताना, त्यांनी केवळ एका शर्टवरून या हत्याकांडाचा तपास केला. या सुटकेसमध्ये शर्टही सापडलं होतं. त्यावरच्या टेलरमार्कवरून पोलिस हल्लेखोरांपर्यंत पोहोचले.
 
सूटकेसमध्ये अवयव सापडले त्या व्यक्तीचं नाव बॅनोटो असं आहे. वाकोल्यात एकटेच राहणाऱ्या बॅनोटो यांची संपत्तीसाठी या मुलीनं हत्या केली. हत्या केल्यानंतर मृतदेहाचे तुकडे तीन वेगवेगळ्या सुटकेसमध्ये भरून ते वाकोल्यात मिठी नदीत फेकून दिले होते. त्यापैकी एक सूटकेस माहीमच्या समुद्रकिनाऱ्यापर्यंत पोहोचली होती. अत्यंक किचकट आणि गुंतागुंतीच्या या प्रकरणाचा छडा लावणाऱ्या पोलिसांचं कौतुक करावं तितकं कमीच.

Web Title :  Mumbai Police Solved Murder Mystery By t-shirt

संबंधित बातम्या

Saam TV Live