चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा केला खून

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 14 जून 2019

मुंबई - चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा गळा दाबून खून केल्याची घटना घाटकोपर येथील रामनगरात घडली आहे. शीतल सचिन दळवी (27) असे मृत विवाहितेचे नाव असून त्या घाटकोपर येथील रायगड को-ऑपरेटिव्ह सोसायटी येथील रहिवासी होत्या. हत्येनंतर मारेकरी पती सचिन दळवी याने पलायन केले असल्याचे पार्कसाईट पोलिसांनी सांगितले. 

सचिन दळवीचा काही वर्षांपूर्वी शीतल हिच्याशी विवाह झाला होता; मात्र काही महिन्यांपासून तो पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला मारहाण करीत असे. बुधवारी त्यांच्यात या विषयावरून भांडण झाले. त्या वेळी त्याने शीतलला गळा दाबून मारहाण केली. ती खाली कोसळल्यानंतर त्याने घरातून पलायन केले. शेजाऱ्यांना हा प्रकार कळल्यानंतर त्यांनी पोलिसांना कळविले. शीतलचा भाऊ राजेश मोरे (रा. कसारा, शहापूर) याच्या फिर्यादीनुसार सचिन दळवीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: murdered in Ghatkopar

संबंधित बातम्या

Saam TV Live