शिवसेनेच्या धमक्यांमुळे माझा भाजप प्रवेश रखडला - नारायण राणे

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 8 मे 2019

मुंबई: नारायण राणेंनी आत्मचरित्र लिहायचे ठरवल्यापासूनच त्याची सर्वत्र चर्चा आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणेंनी आत्मचरित्रातून अनेक खुलासे केले आहेत. एका वृत्तवाहिनीनं यासंदर्भात बातमी दिली आहे.

मुंबई: नारायण राणेंनी आत्मचरित्र लिहायचे ठरवल्यापासूनच त्याची सर्वत्र चर्चा आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणेंनी आत्मचरित्रातून अनेक खुलासे केले आहेत. एका वृत्तवाहिनीनं यासंदर्भात बातमी दिली आहे.

आत्मचरित्रात राणेंनी लिहले आहे की, चंद्रशेखर बावनकुळेंनी मुलीच्या लग्नाचं निमंत्रण मला दिलं होतं. तेव्हा त्या लग्नात माझी मुख्यमंत्र्यांशी भेट झाली. त्यांनीही मला भाजप प्रवेशाचं आश्वासन दिलं. मुख्यमंत्र्यांनी मला वर्षा बंगल्यावरती भेटण्यासाठी बोलावलं. नंतर काही दिवस मुख्यमंत्री संपर्कात होते. त्याचदरम्यान माझी नितीन गडकरींशीही चर्चा झाली होती.

यादरम्यान, मला पक्षात घेतल्यास पाठिंबा काढण्याची धमकी शिवसेनेने दिली. सेनेच्या धमक्यांमुळे भाजप नेतृत्व अस्वस्थ झालं आणि माझा पक्ष प्रवेश रखडला. मुख्यमंत्री म्हणाले होते की, नारायण राणेंना योग्य सन्मान दिला जाईल. राणेंना त्यांच्या राजकीय वजनानुसार मंत्रिपद द्यावं लागेल, असे मुख्यमंत्र्यांनी भाजप नेत्यांना सांगितलं. त्यानंतर नंबर दोनचे नेते चलबिचल झाले. पक्षाच्या भल्यासाठी भाजपत प्रवेश करा, असं सांगणाऱ्या मंत्र्यांना माझा विसर पडला. 

माझ्या घरी टॅक्सीमधून फेऱ्या मारणारे अचानक गायब झाले. त्या ज्येष्ठ नेत्यांना कळलं माझा प्रवेश झाल्यास त्यांच्याकडची मोठी खाती माझ्याकडे येतील. त्यांना दुसऱ्याचे घर वाचवायला गेल्यास स्वतःचे घर खाली होईल, याची भीती सतावू लागली आणि मला पक्षात घेतलं नसल्याचे नारायण राणेंनी सांगितले आहे.

Web Title: My entry in bjp Stuck due to the Second number minister in BJP says Narayan Rane
 


संबंधित बातम्या

Saam TV Live