वांद्रेच्या नर्गिस दत्तनगर झोपडपट्टील आग नियंत्रणात

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 30 ऑक्टोबर 2018

वांद्रेच्या नर्गिस दत्तनगर झोपडपट्टीला लागलेली आग नियंत्रणात आलीय. सकाळी नर्गिस दत्तनगर  झोपडपट्टीला भीषण आग लागली होती. या आगीत  ६० ते ७० झोपड्या जळून खाक झाल्यात.

या अग्निकांडात ३ जण जखमी झालेत तर मोठ्या प्रमाणात वित्तहानी झालीय. दाटीवाटीचा परिसर असल्यानं अग्निशमन दलाला आग विझवताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.

अजूनही या आगीचं कारण अस्पष्ट असून गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळं आग लागल्याचं सांगितलं जातंय. ही आग इतकी भीषण होती आगीचे लोळ दूरवरुन दिसत होते.

संबंधित बातम्या

Saam TV Live