राजीनाम्यानंतर अजितदादांचा फोन 'नॉट रिचेबल'; 16 तासांपासून बेपत्ता

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 28 सप्टेंबर 2019

मुंबई : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे तडकाफडकी राजीनाम्या दिल्यानंतर गेल्या 16 तासांपासून बेपत्ता आहेत. ते नेमके कुठे गेले आहेत, याची कोणालाही माहिती नाही.

आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर अजित पवार हे कोठे आहेत याच्याच चर्चा सुरु आहेत. ते पुण्यातील निवासस्थानीही नाहीत आणि मुंबईतही पोहचलेले नाहीत. त्यामुळे विविध चर्चा सुरु आहेत. शरद पवारही अद्याप मुंबईत पोहचलेले नाहीत. त्यामुळे शरद पवार आणि अजित पवार हे एकत्र होते की काय अशीही चर्चा सुरु आहे.

शुक्रवारी रात्री अजित पवार नगरच्या कर्जत तालुक्यातील अंबालिका साखर कारखान्यावर असल्याची माहिती मिळत होती. अजित पवार दुपारी बारामती आणि पुण्याच्या परिसरात होते. सायंकाळी ते अंबालिका कारखान्यावर गेले. याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती, असं सांगण्यात येत होते. पण, ते तेथेही नव्हते. आजही त्यांचा शोध घेण्यात येत आहे.

राजीनाम्याचे कारण अस्पष्ट असले तरी अंतर्गत वाद शिगेला पोचल्याची चर्चा सुरू झाली आहे. विधान भवनात राजीनामा दिल्यानंतर अजित पवार सुनील तटकरे यांच्यासोबत अज्ञातस्थळी रवाना झाले. त्यांनी सर्व खासगी सचिवांचे दूरध्वनी काढून घेतले. त्यांचा स्वत:चा दूरध्वनीदेखील 'नॉट रिचेबल' आहे.

Web Title: NCP leader Ajit Pawar missing after submit resignation

संबंधित बातम्या

Saam TV Live