बुरख्याबाबतची सेनेची भूमिका अधिकृत नसल्याचा निलम गोऱ्हेंचा खुलासा

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 1 मे 2019

मुंबई : देशात बुरखा बंदी करावी, अशी मागणी करत शिवसेनेचे मुखपत्र दैनिक 'सामना'ने पंतप्रधान नरेंद्र मोदींना सवाल विचारले आहेत. या अग्रलेखावरुन शिवसेनेतले वातावरण चांगलेच तापले आहे. पक्षाची ही भूमीका अधिकृत नसल्याचा खुलासा सेनेच्या प्रवक्त्या डाॅ. निलम गोऱ्हे यांनी केला आहे. त्यामुळे 'सामना'तली भूमीका संपादक असलेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना न विचारताच ठरवली जाते का हा प्रश्न उपस्थित होतो आहे. या मुद्यावरुन 'सामना'चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्याबाबत सेनेत नाराजी पसरल्याची चर्चा आहे. 

श्रीलंका सरकारने तेथे नुकत्याच झालेल्या साखळी बाँबस्फोटांच्या पार्श्वभूमीवर बुरखा बंदीचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'च्या अग्रलेखात केले गेले आहे. 'रावणाच्या लंकेत घडले; रामाच्या अयोध्येत कधी घडणार?' असा सवाल या अग्रलेखातून पंतप्रधान नरेंद्र मोदींना विचारण्यात आला आहे. विशेष म्हणजे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येच्याच दौऱ्यावर आहेत. गेल्या साडेचार वर्षांत भाजपवर सडकून टीका करणाऱ्या शिवसेनेने या निवडणुकीत भाजपशीच युती केली. गेली साडेचार वर्षे सामनाच्या अग्रलेखातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अनेकदा लक्ष्य करण्यात आले होते. असे असताना या दोन्ही पक्षांनी आताची निवडणूक गळ्यात गळे घालून लढली. आता महाराष्ट्रातील मतदानाचा टप्पा संपला आहे. त्यानंतर लगेचच पुन्हा एकदा 'सामना'ने मोदींना सवाल विचारला आहे.

.

मात्र, "शिवसेना नेत्यांच्या बैठकीत भूमीका ठरतात व त्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिक्कामोर्तब करतात. बुरख्याच्या मुद्यावरुन ना पक्षनेत्यांच्या बैठकीत चर्चा झाली होती ना पक्ष प्रमुखांचा तसा आदेश होता. हे चालू घडामोडींवरचे वैयक्तीक मत असू शकते. सामनाच्या अग्रलेखात मांडली गेलेली भूमीका ही शिवसेनेची अधिकृत भूमीका नाही,'' असे जाहीर करुन निलम गोऱ्हे यांनी बाँब टाकला आहे.  सामनाच्या अग्रलेखातून मांडण्यात आलेली ही भूमिका शिवसेनेची अधिकृत भूमिका नसल्याचे शिवसेना प्रवक्ते निलम गोऱ्हे यांनी स्पष्ट केल्याने पक्षाचे मुखपत्र असलेल्या 'सामना'चे संपादकीय लिखाण  शिवसेना पक्ष प्रमुखांना न विचारता केले जाते का? तसेच शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना विश्वासात न घेता परस्पर अग्रलेख लिहिले जातायेत का...? असे प्रश्न उपस्थित झाले आहेत. आजच्या सामनातील अग्रलेखावरून शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्यावर नाराज, असल्याची सूत्रांची माहिती आहे.

web title :  Neelam Gorhe Criticize to Udhav thackrey 

संबंधित बातम्या

Saam TV Live