ठाकरेंची संपत्ती किती? पहिल्यांदाच कळणार...

Uddhav thackeray, Maharashtra Chief mininster
Uddhav thackeray, Maharashtra Chief mininster

मुंबई : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सहा महिन्यात विधीमंडळाचे सदस्य व्हावे लागणार आहे. त्यामुळे त्यांना आपली संपत्ती जाहीर करावी लागणार आहे.


शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी विधान सभेची निवडणुक लढवताना त्यांची संपत्ती 16 कोटी रुपये असल्याचे जाहीर केले होते.त्यानंतर आता उद्धव ठाकरे उद्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील. ही शपथ घेतल्यानंतर त्यांना सहा महिन्यात विधानसभा किंवा विधानपरिषदेचे सदस्य व्हावे लागेल. ते माहिम मतदार संघातून निवडणुक लढण्याची शक्यता आहे. ही निवडणूक लढताना त्यांना प्रतिज्ञापत्रावर स्वतःची संपत्ती जाहीर करावी लागणार आहे.


खासदार नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यानंतर शिवसेनेवर आरोप केेेेले होते. त्यात संपत्ती जाहीर करावी सागेल म्हणून ठाकरे निवडणूक लढत नाही हा आरोपही होता. त्यानंतर ठाकरे यांच्या संपत्तीची प्रामुख्याने चर्चा सुरु झाली होती. मात्र आता लवकरच ठाकरे यांच्या संपत्तीचे गुपित उघड होणार आहे.

Web Title: newly elected chief Minister Uddhav thackeray now Wealth has to be declared

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com