गांगुलीचा पाकला दणका... घेतला 'हा' मोठा निर्णय

sourav ganguly, Cricket News, Asia XI, Team India
sourav ganguly, Cricket News, Asia XI, Team India

मुंबई : भारताचे माजी कर्णधार सौरव गांगुलींनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्षपद स्वीकारल्यापासून अनेक मोठे आणि महत्वाचे निर्णय घेतले आहेत. आता असाच एक मोठा निर्णय गांगुलीने घेतला आहे. आशिया इलेव्हन आणि वर्ल्ड इलेव्हन यांच्यात बांगलादेशमध्ये होणाऱ्या सामन्यांसाठी बीसीसीआयने पाकिस्तानच्या एकही खेळाडूला खेळण्याची संमती दिलेली नाही. 

या स्पर्धेत भारत, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या तीन देशांचे खेळाडू खेळणार आहेत. बांगलादेशचे संस्थापक शेख मुजीबुर रहमान यांची जन्मशताब्दीनिमित्त या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. हे ट्वेंटी20 सामने मार्च महिन्यात 18 आणि 21 तारखेला ढाकामध्ये होणार आहेत.

या स्पर्धेत पाकिस्तानच्या एकही खेळाडूला सहभागी होता येणार नाही. भारत आणि पाकिस्तानमध्ये गेल्या सात वर्षांपासून द्विपक्षीय मालिका खेळविली जात नाही. ''या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तानचे खेळाडू एकत्रितपणे अंतिम संघात खेळतील अशी परिस्थिती येणारच नाही कारण एकही पाकिस्तानी खेळाडू आमंत्रण दिले जाणार नाही,'' असे बीसीसीआयचे सहसचिव जयेश जॉर्ज यांनी स्पष्ट केले. 

टीम इंडियातून निवडणार पाच खेळाडू
बांगलादेशमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या या स्पर्धेसाठी भारतीय संघातून पाच खेळाडूंची निवड केली जाणार आहे. या स्पर्धेच्या कालावधीतच भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळणार आहे. त्यामुळे हे पाच खेळाडू कोणते असतील हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 

बीसीबीने केली या खेळाडूंची मागणी
बांगलादेश क्रिकेट बोर्डाने या स्पर्धेसाठी महेंद्रसिंह धोनी, जसप्रित बुमरा, हार्दिक पंड्या, भुवनेश्वर कुमार, रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजा यांना पाठविण्यात यावे अशी इच्छा व्यक्त केली आहे. मात्र, स्पर्धेसाठी कोणते खेळाडू जातील याचा निर्णय गांगुलीच घेतील.  

Web Title: No Pakistani players will be included in Asia XI clears BCCI

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com