कमळाचं फुल दाखवा परदेशात जा... असं कसं? पाहा

Indian Passport
Indian Passport

जगभरात कुठेही प्रवास करण्यासाठी आवश्यक दस्तावेज असलेल्या भारतीय पासपोर्टवर कमळाचं चिन्ह दिसणार आहे. मात्र सरकारच्या या निर्णयाला जोरदार विरोध केला जातोय. केरळच्या कोझिकोडमध्ये कमळ चिन्ह असलेल्या पासपोर्टचं वाटप झाल्याचा मुद्दा गुरूवारी संसदेत देखील प्रचंड गाजला. कमळ हे जरी राष्ट्रीय फुल असलं तरी ते भाजपचं निवडणूक चिन्ह असल्याने या माध्यमातून भाजप आपला राजकीय प्रचार करत असल्याचा विरोधकांचा दावा आहे.  

मात्र बनावट पासपोर्ट ओळखण्यासाठी आणि पासपोर्टची सुरक्षा मानकं अधिक बळकट करण्यासाठी कमळाचं चिन्ह लावल्याचा परराष्ट्र मंत्रालयाचा दावा आहे. शिवाय कमळ हे आपलं राष्ट्रीय फूल असून कमळाव्यतिरिक्त राष्ट्रीय प्राणी वगैरे चिन्हांचा सुद्धा पुढे या हेतूसाठी वापर करण्यात येणार असल्याचा दावाही सरकारने केलाय.  म्हणजेच इंटरनॅशनल सिव्हील अॅव्हिएशन ऑर्गनायझेशनच्या नियमावली अंतर्गत हे बदल करण्यात आल्याची पुस्तीही परराष्ट्र मंत्रालयाद्वारे सांगण्यात आलंय. शिकागो करारानुसार जागतिक स्तरावरील विमान वाहतूक अधिक सुरक्षित आणि किफायतशीर करणं तसंच विमान वाहतूकीशी संबंधित नियोजन आणि विकासाबाबतच्या कार्यवाहीची जबाबदारी या संस्थेकडे आहे.

हा सगळा प्रकार म्हणजे सरकारी यंत्रणांचं भगवेकरण करण्याचा घाट घातल्याचा आरोप केला जातोय. यापुर्वीही शिक्षणाच्या भगवेकरणाचा आरोप भाजपवर झालाय. मात्र नागरिकांच्या दृष्टीने महत्वाच्या अशा शासकीय दस्तावेजाचा अशा पद्धतीने आपला राजकीय अजेंडा रेटण्यासाठी वापर होत असेल तर तो सर्वस्वी चुकीचाच म्हणावा लागेल.

Web Title : lotus Symbol On Indian Passport

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com