मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मोठी UPDATE

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 23 डिसेंबर 2019

मुंबई : महाराष्ट्रातील मंत्रिमंडळ विस्तार पुन्हा एकदा लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवली जातेय. आज दिल्लीमध्ये महाराष्ट्रातील मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होणार असल्याची माहिती देखील समोर येतेय. यामुळे उद्याच मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचं बोललं जात होतं. अशात आता अनेक दिवसांपासून रखडलेला महाराष्ट्राचा मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडणार असल्याचं समजतंय.

भाजपला 'बुरे दिन'; झारखंडमध्ये भाजपचा टांगा पलटी... 

मुंबईतील सह्याद्री या शासकीय गेस्ट हाऊस वरील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यातील बैठक संपली. या सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे शिवसेनेकडून आपली यादी तयार केली गेलीये, राष्ट्रवादीकडून देखील आपल्या मंत्र्यांची यादी तयार ठेवण्यात आली आहे.

अशात कॉंग्रेसच्या यादीकडे सर्वांचं लक्ष आहे. यासाठी महत्त्वाचे नेते गेले काही दिवस दिल्लीत तळ ठोकून आहेत. मात्र कॉंग्रेसची यादी अद्याप ठरलेली नाही. त्यामुळे उद्या होणारा संभाव्य महाराष्ट्र राज्याचा मंत्रिमंडळ आणखीन पुढे ढकलला जाणार असल्याचं बोललं जातंय. 

सूत्रांच्या माहितीनुसार उद्या दुपारपर्यंत कॉंग्रेसची यादी तयार होणार असल्याचं समजतंय. अशात आता 27 डिसेंबरला महाराष्ट्रातील मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येतंय.

तोंडात फुटला बॉम्ब! मस्करीची झाली कुस्करी...

उद्या संध्याकाळी राज्य मंत्रिमंडळाची बैठक : 

दरम्यान, उद्या दुपारी चार वाजता सह्याद्री गेस्ट हाऊसला मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत राज्यातील शेतकरी कर्जमाफीबद्दल काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात येणार असल्याचं बोललं जातंय. 

Webtitle : once agian maharashtra state cabinet expansion postponed

संबंधित बातम्या

Saam TV Live