आरेवर कुऱ्हाड; रातोरात आरेमध्ये 200 झाडांची कत्तल

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 5 ऑक्टोबर 2019

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने आज आरे वसाहतीतील मेट्रो कारशेडसाठी होणाऱ्या वृक्ष कापणी विरोधातील याचिका फेटाळल्यानंतर रात्री तत्काळ वृक्ष कापणीस सुरवात झाली असून तब्बल 200 झाडांची रात्रीत कत्तल करण्यात आली आहे. तसा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. विधानसभा निवडणूक विरोधकांकडून हा प्रचाराचा मुद्दा होण्याची शक्‍यता आहे. 

आरे वसाहतीतील 2700 झाडे कापण्याच्या प्रस्तावाला गेल्या महिन्यात महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाने परवानगी दिली. मात्र, शिवसेनेसह एका सामाजिक संघटनेने या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, याच काळात महानगरपालिकेच्या उद्यान विभागामार्फत झाडे कापण्याची परवानगी देणारे पत्र मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनाला दिले होते. मात्र, याचिका प्रलंबित असल्याने ही झाडे कापता येत नव्हती. 

Image

आज उच्च न्यायालयाने आरे बचाव याचिकाकर्त्यांच्या याचिका फेटाळल्या. त्यानंतर तत्काळ रात्रीच्या वेळी झाडे कापण्यास सुरुवात झाल्याचे समजते. या ठिकाणी महामुंबईतील मेट्रो रेल्वेचे मुख्यालय बनणार आहे. त्याचे प्रमुख नियंत्रण कक्ष असेल. त्याच बरोबर कुलाबा सिप्झ या मेट्रोच्या भुयारी मार्गाची कारशेडही असेल. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ही झाडे कापण्यास सुरवात झाल्याने हा प्रचाराचा मुद्दा केला जाऊ शकतो. शिवसेनेने ही झाडे कापण्यास विरोध केला होता. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कामाचे समर्थन केले होते. आता झाडे कापण्यास सुरवात झाल्याने शिवसेनेची अडचण होऊ शकते. 

आरेतील वृक्षतोडीबाबत सोशल मीडियावर प्रचंड मोठ्या प्रमाणात निषेध व्यक्त केला जात असून आरेतही पर्यावरण प्रेमींनी विरोध करत आंदोलन करण्यास सुरवात केली आहे. 

Web Title: Over 200 trees cut in Mumbai Aarey Forest Activists Protest

संबंधित बातम्या

Saam TV Live