गोपीनाथ गडावरील पोस्टरवरून कमळ गायब; आज महाराष्ट्रात राजकीय भूकंप?

विनोद तळेकर
गुरुवार, 12 डिसेंबर 2019

नाराज असलेल्या पंकजा मुंडे पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा सुरू असतानाच गुरूवारी गोपीनाथ गडावरील कार्यक्रमाच्या पोस्टर्सवरून भाजपचं कमळ हे चिन्ह गायब झालंय. एवढंच नव्हे तर सोहळ्याच्या पोस्टर्सवरून मोदी, शहा, फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यासारख्या नेत्यांच्या फोटोलाही स्थान देण्यात आलेलं नाही. तसंच मेळाव्याच्या ठिकाणी भाजपचे झेंडेसुद्धा लावण्यात आलेले नाहीत. हे चित्र म्हणजे पंकजा मुंडे पक्षाला रामराम ठोकणार असल्याचे स्पष्ट संकेत असल्याचं मानलं जातंय. 

खरंतर निवडणूक जाहीर झाल्यानंतर अनेक दिग्गजांना भाजपने तिकीट नाकारल्याने नाराजीचा सूर उमटू लागला होता. मात्र राज्यात पुन्हा भाजपची सत्ता येईल आणि तिकीट जरी मिळालं नसलं तरी सत्तेचा काहीतरी वाटा आपल्या झोळीत पडेल, या आशेवर या नाराजांनी मौन बाळगणं पसंत केलं होतं. पण सत्तास्थापनेच्या प्रयत्नातही भाजप नेतृत्व अपयशी ठरल्यानंतर मात्र नाराजांचे हे दबलेले सूर स्पष्टपणे उमटू लागले. भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी तर थेट पक्षनेतृत्वावरच हल्लाबोल केला. याशिवाय विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे, प्रकाश मेहता, पुण्याच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनीही आपली नाराजी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे व्यक्त केलीय. मात्र या सर्व नेत्यांपैकी पंकजा मुंडेंच्या नाराजीची सर्वाधिक चर्चा होतेय. 

अवघ्या सात आठ वर्षांपुर्वी गोपीनाथ मुंडेंनीही पक्षनेतृत्वाविरोधात बंडखोरीची तलवार उपसली होती. मात्र पुढे बंडखोरीची तलवार म्यान करून गोपीनाथरावांनी पक्षनेतृत्वाशी जुळवून घेतलं होतं. आज त्याच राजकीय वळणावर पंकजा मुंडेही उभ्या आहेत. आता पाहायचं एवढंच की त्या आपल्या वडिलांची वाट निवडतात की स्वत:ची वेगळी वाट निवडतात

Web Title : Pankaja Munde Many Be Join shivsena Tomorrow

संबंधित बातम्या

Saam TV Live