VIDEO | पंकजा मुंडेंच्या पक्षांतराच्या चर्चांवर चंद्रकांत पाटील म्हणतात की...

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 2 डिसेंबर 2019

पुणे : गेल्या 2 दिवसांपासून भाजपनेत्या या भाजपव्यतिरिक्त अन्य कोणता विचार करतील असा चर्चा सुरू आहे. परंतु, अशा कोणत्याही बातम्यांना अर्थ नसल्याचे स्पष्टीकरण भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे. पंकजा मुंडे यांच्याशी बोलणं झालं असून ज्या स्तरावरून त्या इथपर्यंत आल्या आहेत. त्यावरून त्या असा विचार करणार नाहीत, असेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

पंकजाताई का नाराज कुठे जाणार ?

पंकजा मुंडेंच्यासंदर्भातील आजच्या BREAKINGS

नाराज पंकजांच्या मनधरणीसाठी BJP चा प्लॅन

पंकजांसह अनेक बडे नेते शिवसेनेच्या संपर्कात - संजय राऊत  

पाटील म्हणाले, 'राज्याचा भाजप अध्यक्ष म्हणून मी अधिकृतपणे आपल्यासमोर आलो आहे. 12 डिसेंबरला गोपिनाथ मुंडे यांचा जन्मदिवस मोठ्या आनंदाने साजरा करण्यात येतो, दरवेळी आम्ही जातच असतो यावेळीही आम्ही जाणार आहोत'. पराभवानंतर  मोठे नेते आत्मपरीक्षण करत असतात ते प्रत्येकाने करायलाच हवं, पंकजाताई ही सध्या आत्मपरिक्षण करत असून त्यांची मानसिक स्थितीवरून त्या दुसरीकडे जाणार आहेत असे नाही, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

 पंकजाताईंना पक्षात त्या गोपिनाथ मुंडे यांच्या कन्या असल्याने त्यांना यश काही सहज मिळालेले नाही. त्यांनी ते संघर्ष करून मिळवले आहे. वडिल गोपिनाथ मुंडे यांच्या अकाली निधनानंतरही त्या तुटल्या नाहीत त्यांनी जबाबदारी घेत बहिणीला लोकसभेच्या निवडणुकीत जिंकवलं. पंकजा दुसऱ्या पक्षात जाणार ही कल्पना अपघाताने जे सरकार आलाय त्यांच्या डोक्यातून आलेली असल्याचे पाटील यांनी सांगितले. ते सरकार किती दिवस टिकणार हेही माहीत नाही, असा टोलाही चंद्रकांत पाटील यांनी लगावला.

Web Title: Pankaja Munde not quitting BJP Says Chandrakant Patil

संबंधित बातम्या

Saam TV Live