घाटकोपरमध्ये चार्टर्ड विमान कोसळलं ;

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 28 जून 2018

मुंबई: घाटकोपर मधील सर्वोदय रूग्णालयाजवळ चार्टर्ड विमान कोसळलंय.. चार्टर्ड विमान कोसळल्याने मोठा आवाज झाला, त्यामुळे  परिसरात आगीचे लोट पसरले आहेत. आचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ पसरली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. प्रथम हा आवाज नक्की कुठून आला हे नागरिकांना कळत नव्हते. या विमानातील वैमानिकासह चार जणांचा मृत्यू  झालाय. दरम्यान, NDRF ची टीम घटनास्थळी दाखल झालीये..  

सर्वोदय रूग्णालयाशेजारील काम चालू असलेल्या जागृती इमारतीवर हे विमान कोसळले. जाणकारांच्या माहितीनुसार वैमानिकाच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली आहे. 

अग्निशामन दल घटनास्थळी पोहोचले असून आग विझवण्याचे काम सुरू असून, परिस्थिती नियंत्रणात आहे. 

Tags

संबंधित बातम्या

Saam TV Live