VIDEO | 'RBI चोर है' म्हणत संतप्त PMC खातेधारकांचं तीव्र आंदोलन

high Court, PMC Bank Account holder, PMC Bank
high Court, PMC Bank Account holder, PMC Bank

PMC खातेधार आपले पैसे मिळावे म्हणून हरतऱ्हे प्रयत्न करतायत. अशातच आज मुंबईतील उच्च न्यायालयात PMC बॅंकेसंदर्भातील केसची तारीख होती. याच पार्श्वभूमीवर PMC खातेधारक आज मुंबई उच्च न्यायालयासमोर एकत्रित आलेत. एकत्रित येत PMC खातेधारकांनी मुंबई उच्च न्यायालयाबाहेर आंदोलन केलंय. 

लवकरात लवकर आपले संपूर्ण पैसे परत मिळाले नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा PMC खातेधारकांनी दिला आहे. PMC खातेधारकांकडून 'RBI चोर है'च्या घोषणा देण्यात आल्यात. मुंबई उच्च न्यायालयाबाहेर PMC  खातेधारकांकडून  आज आंदोलन करण्यात आलंय.

"हे आमच्या मेहनतीचे पैसे आहेत. कोणतीही चोरीमारी करून कमावलेले हे पैसे नाहीत. कुणाच्या घरात लग्न आहे, कुणाला आजारपणासाठी पैसे हवेत तर कुणाची आयुष्याची संपूर्ण जमापुंजी ही बँकेत अडकली आहे."

- PMC खातेधारक  

अशात पैसे काढता येत नसल्याने PMC खातेधारक आक्रमक झालेत.त्यात आता मुंबई उच्च न्यायालयाकडून तारीख पे तारीख मिळत असल्याने PMC बँक खातेधारकांचा उद्रेक आज पाहायला मिळाला. PMC घोटाळ्यानंतर  अनेकांनी आपला जीव गमावला आहे. पैसे मिळवण्यासाठी हे खातेधारक दररोज वणवण करतायत. यापुढे पैसे मिळण्यासंदर्भात ठोस पावलं उचलली गेली नाही तर आंदोलन आणखी तीव्र झालेलं आपल्याला पाहायला मिळू शकतं. 

6500 कोटींहून अधिक गैरव्यवहार!
पीएमसी बँक गैरव्यवहार प्रकरणात बँकेच्या अंतर्गत चौकशी समितीने मोठी माहिती दिली आहे. यामध्ये बँकेच्या रेकॉर्डमधून एकूण 10.5 कोटींची रक्कम गायब झाल्याचे समितीने सांगितले आहे. बँकेत झालेला गैरव्यवहार हा 4355 कोटी रुपयांचा नसून, 6500 कोटींहून अधिक असल्याचेही समोर आले आहे. PMC बँकेच्या अंतर्गत चौकशी समितीला जे चेक मिळाले आहे. ते 10 कोटींहून अधिक रकमेचे आहेत. इतर 50-55 लाख रुपयांच्या रकमेसंदर्भात माहिती नाही. तसेच हा गैरव्यवहार समोर आल्यानंतर बँक अधिकाऱ्यांनी सुरवातीला 4355 रुपयांचा झाल्याचे सांगितले होते. मात्र, आता या गैरव्यवहार आकडा वाढला असून, 6500 कोटींहून अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय बँकेच्या रेकॉर्डवरून 10.5 कोटी रुपये गायब झाल्याचे सांगितले जात आहे. 

Webtitle : PMC Account holders agitation against mumbai high court

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com