मुंबईतल्या पंजाब नॅशनल बँकेत 11 हजार 360 कोटींचा घोटाळा... 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 15 फेब्रुवारी 2018

देशाच्या सार्वजनिक क्षेत्रातील दुसऱ्या क्रमांकाच्या पंजाब नॅशनल बँकेच्या मुंबई शाखेत जवळपास 11 हजार 360 कोटी रूपयांचा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे. मुंबईतल्या ब्रिच कँडी परिसरातल्या शाखेत हिरा व्यापारी नीरव मोदी यांनी आपल्या मित्रांच्या सहाय्याने बँकेला हा गंडा घातल्याचा आरोप आहे. नीरव मोदीची आई आणि भावाविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाय पीएनबीने सीबीआयला लूकआऊट नोटीस जारी करण्यास सांगितलं आहे. नीरव मोदीची भारतातील 'डायमंड किंग' अशीही ओळख आहे. फोर्ब्सच्या आकडेवारीनुसार नीरव मोदीची जवळपास 12 हजार कोटींची संपत्ती आहे.

देशाच्या सार्वजनिक क्षेत्रातील दुसऱ्या क्रमांकाच्या पंजाब नॅशनल बँकेच्या मुंबई शाखेत जवळपास 11 हजार 360 कोटी रूपयांचा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे. मुंबईतल्या ब्रिच कँडी परिसरातल्या शाखेत हिरा व्यापारी नीरव मोदी यांनी आपल्या मित्रांच्या सहाय्याने बँकेला हा गंडा घातल्याचा आरोप आहे. नीरव मोदीची आई आणि भावाविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाय पीएनबीने सीबीआयला लूकआऊट नोटीस जारी करण्यास सांगितलं आहे. नीरव मोदीची भारतातील 'डायमंड किंग' अशीही ओळख आहे. फोर्ब्सच्या आकडेवारीनुसार नीरव मोदीची जवळपास 12 हजार कोटींची संपत्ती आहे. दरम्यान घोटाळ्यात संशयित असलेले प्रतिष्ठित हिरे व्यावसायिक निरव मोदी व अन्य तिघे देश सोडून फरार झाले आहेत.


संबंधित बातम्या

Saam TV Live