खासगी डॉक्टरांचा आज देशभरात संप

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 31 जुलै 2019

मुंबई - राष्ट्रीय वैद्यकीय कमिशन विधेयकाच्या विरोधात भारतीय वैद्यकीय संघटना (आयएमए) या खासगी डॉक्‍टरांच्या संघटनेने बुधवारी (ता. 31) देशव्यापी संप पुकारला आहे. त्यामुळे बुधवारी दिवसभर खासगी वैद्यकीय सेवा बंद ठेवण्यात येतील. केवळ अत्यावश्‍यक सेवेत डॉक्‍टर सहभागी होतील. या विधेयकाच्या विरोधात खासगी वैद्यकीय सेवेतील डॉक्‍टरांनी एक दिवसाचे उपोषण करण्याची घोषणा केली आहे. 

खासगी वैद्यकीय सेवेतील रुग्णालये आणि दवाखाने बुधवारी सकाळी 6 वाजल्यापासून गुरुवारी सकाळी 6 वाजेपर्यंत बंद ठेवले जातील. नॅशनल मेडिकल कमिशन विधेयक सोमवारी लोकसभेत संमत झाले. या विधेयकाला सुरुवातीपासूनच वैद्यकीय क्षेत्रातून विरोध होत आहे. या मुद्द्यावर आयएमएने आंदोलने केली होती. विधेयक संमत झाल्यानंतर आयएमच्या देशभरातील शाखांतर्फे निदर्शने सुरूच होती. आता आंदोलन आणखी तीव्र करण्याची वेळ आली आहे, अशी भूमिका आयएमएच्या सदस्यांनी मांडली. या विधेयकानुसार परिचारिका, फार्मासिस्ट आदी वैद्यकीय शिक्षण न घेतलेल्यांनाही रुग्णांना औषधे देण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे हे विधेयक योग्य नसल्याचा दावा आयएमएने केला आहे.

Web Title: Private doctors on strike across the country today

संबंधित बातम्या

Saam TV Live