मुंबईतील सार्वजनिक वाहतुकीसाठी एकच तिकीट

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 24 फेब्रुवारी 2018

मुंबई महानगरातील बेस्ट, रेल्वे, मोनो आणि मेट्रो आदी सार्वजनिक वाहतूक यंत्रणांसाठी एकच तिकीट व्यवस्थापन प्रणाली तयार करण्यात येत आहे. या प्रणालीच्या पहिल्या टप्प्याचे काम 1 मार्चपासून सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिले. ही तिकीट प्रणाली अकाऊंटबेस स्मार्ट कार्डच्या रुपात असून त्यामध्ये कुठूनही रिचार्ज करता येणार आहे. यामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार असून सार्वजनिक वाहतुकीस चालना मिळणार आहे. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live