लोणावळा घाटात मालगाडीचे डबे घसरले, मुंबई-पुणे वाहतूक ठप्प

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 1 जुलै 2019

पुणे : कर्जत आणि लोणावळ्यामधील घाट विभागातील जामरुंग ते ठाकूरवाडी दरम्यान मालगाडीच्या अपघात होऊन सहा डबे घसरले आहेत. त्यामुळे डाऊन मेन लाईन पूर्णपणे बंद झाली आहे.

या घटनेमुळे मुंबईवरु पुण्याकडे येणाऱ्या सर्व लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. पुणे मुंबई दरम्यान धवणाऱ्या सर्व गाड्या रद्द केल्या आहेत. तर या मार्गावरून धावणाऱ्या काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. यामुळे पुणे ते मुंबई प्रवास करणाऱ्या प्रवांशाचे मोठ्या प्रमाणात हाल झाले आहेत.

railway

 रद्द करण्यात आलेल्या गाड्या
 1) पुणे-सीएसएमटी इंद्रायणी एक्सप्रेस (22106)
 2) पुणे-सीएसएमटी इंटरसिटी एक्सप्रेस (12128)
 3) पुणे-सीएसएमटी डेक्कन एक्सप्रेस (11008)
 4) सीएसएमटी-पुणे डेक्कन क्वीन (12123)
 5) सीएसएमटी-पुणे प्रगती एक्सप्रेस (12125)
 6) सीएसएमटी-पुणे इंद्रायणी एक्सप्रेस (22105)
 7) सीएसएमटी-पुणे इंटरसिटी एक्सप्रेस (12127)
 8) सीएसएमटी-पुणे डेक्कन एक्सप्रेस (11007)
 9) सीएसएमटी-कोल्हापूर कोयना एक्सप्रेस (11092) 
10) पुणे-पनवेल पॅसेंजर (51318)
 11) पनवेल-पुणे पॅसेंजर (51317)
 12) पुणे-सीएसएमटी डेक्कन क्वीन (12124)
 13) पुणे-सीएसएमटी प्रगती एक्सप्रेस (12126)

मुंबई आणि पुणे दरम्यान रद्द करण्यात आलेल्या गाड्या 
भुसावळ-पुणे एक्सप्रेस (11025)
पुणे-भुसावळ एक्सप्रेस (11026)

कल्याण-इगतपुरी-मनमाड मार्गे वळविण्यात आलेल्या गाड्या
1) सीएसएमटी-केएसआर बेंगलुरू उदय एक्सप्रेस (11301)
2) अहमदाबाद-कोल्हापूर एक्सप्रेस (11094 )
3) अहमदाबाद-पुणे दुरांतो एक्सप्रेस (12297)
4) इंदौर-पुणे एक्सप्रेस (22944)
 
Web Title: Mumbai Pune Railways cancelled due to accident at Lonavala

संबंधित बातम्या

Saam TV Live