मध्य, पश्चिम रेल्वेवरील रेल्वे आरक्षण केंद्र राहणार बंद

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

मुंबई : मुंबईतील रेल्वे आरक्षण केंद्रामध्ये क्रिसकडून सुधारणा करण्यात येत आहे. त्यासाठी केल्या जाणाऱ्या तांत्रिक कामांसाठी मध्य, पश्चिम रेल्वेवरील रेल्वे आरक्षण केंद्र आणि संगणकीय आरक्षण 19 ऑगस्ट रोजी पावणेतीन तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

दिवसभरात आरक्षण सेवा दोन टप्प्याटप्यांत बंद राहील, अशी माहिती रेल्वेकडून देण्यात आली.

दुपारी सव्वादोन ते सव्वातीन वाजेपर्यंत आरक्षण उपलब्ध नसेल. तर रात्री पावणेअकरा ते मध्यरात्री साडेबारा वाजेपर्यंत बंद राहील, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली. मध्यरात्री साडेबारानंतर मात्र आरक्षण सेवा पुन्हा उपलब्ध होईल.

WebTitle : marathi news mumbai rail reservation counter to remain close 

संबंधित बातम्या

Saam TV Live