LIVE UPDATE | मुंबईमध्ये अवकाळी पावसाची बॅटिंग

MUMBAI RAINS LIVE UPDATES THANE AND MUMBAI CITY
MUMBAI RAINS LIVE UPDATES THANE AND MUMBAI CITY

मुंबई : आज सकाळपासून मुंबई आणि ठाणे परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मुंबईसह उपनगर आणि ठाणे जिल्ह्यात आज, सकाळपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली. सकाळची वेळ असल्यामुळं चाकरमान्यांची धावपळ झाली. उपनगरीय रेल्वे सेवेवर या पावसाचा किरकोळ परिणाम झाल्याची माहिती मिळत आहे. 

जोरदार पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विलंबाने धावत आहे. तसेच ट्रान्स हार्बर मार्गावर सकाळी 7.30 वाजता रबाळे स्थानकात तांत्रिक बिघाडामुळे या मार्गावरील ही वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे. मध्य रेल्वेवर घाटकोपर ते कुर्ला मार्गावरील लोकल अतिशय धीम्या गतीने धावत आहे. परिणामी मध्य रेल्वेवरील अप मार्गावरील धीम्या आणि जलद लोकल सेवा 10 ते 15 मिनिटे उशीराने धावत आहेत .  पावसामुळे दोन्ही मार्गावरील रेल्वे वाहतूक मंदावली असून याचा फटका प्रवाशांना बसत आहे

मुंबईत विशेषतः ठाणे शहर परिसरात पहाटेपासूनच दमदार पाऊस सुरू झाला. त्यामुळं कामानिमित्त मुंबईच्या दिशेने जााणाऱ्या रेल्वे आणि उपनगरीय वाहतुकीवर याचा परिणाम झाला. मध्य रेल्वेच्या रेल्वेस्थानकांवर गर्दीच्या वेळी पाऊस सुरू असल्याने काही ठिकाणी परिस्थिती आणखीनच बिकट झाली. ठाण्यासह डोंबिवली परिसरातही सकाळपासून पाऊस सुरू आहे. आज सकाळीपासूनच ठाणे शहरातील घोडबंदर रोड, नौपाडा, पाचपाखाडी ,कळवा या ठिकाणी  पावसाने हजेरी लावलेली आहे सकाळ पासून पडणाऱ्या पावसामुळे हवेत सुखद गारवा निर्माण झाला आहे तसेच शहरातील सखल भागात अद्याप तरी पाणी साचलेलं नाही.

दरम्यान, मध्य रात्रीपासून पालघर मध्ये परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावली असून सकाळपासून पावसाची रिपरिप सुरूच आहे. अरबी समुद्रात तयार झालेल्या महा चक्रीवादळामुळे पालघरच्या पश्चिम किनारपट्टी लगतं तसेच पूर्व भागात परतीच्या पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे पालघर  शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास या अस्मानी संकटाने हिरावून घेतलाय . या पावसाचा फटका भात शेतीला बसल्यामुळे शेतकरी हवालदील झाला आहे. पावसाची शक्यता असल्यामुळे पालघरमध्ये शाळा-महाविद्यालयांना तीन दिवसांची सुटी यापूर्वीच जाहीर करण्यात आलीय. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com