मुंबईत आजही मुसळधार पावसाचा इशारा.. 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 26 जून 2018

सोमवारी पावसानं मुंबईत कहर केल्यानंतर मंगळवारी म्हणजेच आजही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. येत्या 24 तासांत मुंबईत मुसळधार पाऊस होण्याची शक्यताय. त्यामुळे शक्य असेल, तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन प्रशासनाकडून कऱण्यात येतंय.

मुंबई ठाण्यासह उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता कुलाबा वेधशाळेनं व्यक्त केलीय. तर ४८ तासांनंतर मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांत पावसाची तीव्रता आणखी वाढणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय.

मध्य-महाराष्ट्रातील जळगाव, अहमदनगर आणि नाशिक या जिल्ह्यांत पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे. या काळात  ढगाळ वातावरणामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील तापमानात घट होणार आहे.

संबंधित बातम्या

Saam TV Live