मुंबईतील पावसाने 46 वर्षांचा रेकॉर्ड मोडला, वाचा दोन चार तासाच्या पावसाने का तुंबते मुंबई?

साम टीव्ही
गुरुवार, 6 ऑगस्ट 2020
  • 26  जुलैपेक्षा ही भंयकर
  • मुंबईत असा पाऊस झालाच नाही
  • पावसाने ४६ वर्षांचा रेकॉर्ड मोडला

दोन दिवस पडणाऱ्या रेकॉर्डब्रेक पावसाने मुंबई महापालिका प्रशासनाच्या मर्यादा पुन्हा एकदा स्पष्ट केल्यात. तासा दोन तासाच्या पावसाने मुंबई वारंवार का तुंबते हे दाखवणारा हा स्पेशल रिपोर्ट.

मुंबईतल्या दादर भागातल्या शिंदेवाडीत राहणारं हे सोळुंखे कुटुंब..कालच्या पावसाने असंख्य मुंबईकरांप्रमाणे यांच्याही घराची वाताहात झालीय. कुलाबा वेधशाळेत तर कालच्या पावसाची विक्रमी नोंद झाली. ४६ वर्षानंतर ऑगस्टमध्ये १२ तासांत मुंबईत २९४ मिमी पावसाची नोंद झालीय. 

ताशी 25 मिलीमीटर पाऊस पडल्यास पावसाचं पाणी समुद्रात वाहून नेण्याची क्षमता मुंबईच्या पर्जन्य वाहिन्यांमध्ये आहे. त्यापेक्षा अधिक वेगाने पाऊस पडल्यास मुंबई तुंबते. ही बाब लक्षात घेत 2006 साली नेमलेल्या चितळे समितीने ताशी 50 मिलीमीटर इतक्या पावसाचं पाणी वाहून नेण्याची क्षमता असलेल्या पर्जन्य वाहिन्या उभारण्याची शिफारस केली. त्यानुसार ब्रिमस्टोवॅड हा प्रकल्प हाती घेतला गेला. मात्र अतिक्रमणामुळे हा प्रकल्प रखडलाय. 

शिवाय मुंबईत पडणाऱ्या पावसाचं पाणी वाहून नेणारे जवळपास दोन हजार छोटे मोठे नाले आहेत. मात्र यापैकी जवळपास ८० टक्के नाले हे समुद्राला भरती आली की भरतीच्या पाणी पातळी खाली जातात. त्यामुळे त्यातून पाणी बाहेर टाकलं जाऊ शकत नाही.
 
एकूणच पंधरा वर्षांपुर्वीच्या 26 जुलैच्या महापुरातून आपण काहीच धडा घेतला नाही हेच यातून स्पष्ट होतंय.


संबंधित बातम्या

Saam TV Live