गोरेगाव पश्चिममध्ये झाड उन्मळून पडल्याने काही काळ  वाहतूक ठप्प

 गोरेगाव पश्चिममध्ये झाड उन्मळून पडल्याने काही काळ  वाहतूक ठप्प

गोरेगाव पश्चिममध्ये झाड कोसळल्याची घटना घडलीय. उन्नत नगरमधील गजानन महाराज मठासमोर झाड उन्मळून पडलंय. त्यामुळे वाहतूक काही काळ ठप्प झाली. पहिल्याच पावसात मुंबईत झाडं कोसळण्याच्या घटना घडत असल्याने नागरिकांनी झाडाखाली गाड्या लावू नयेत असं आवाहन केलं जातंय.

पुढील काही तासांत मुंबईसह उपनगरात जोरादार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मुंबईसह पालघर, भिवंडी, ठाणे, कल्याण, दादर, माहीम या भागांत पावसाने हजेरी लावली आहे. उपनगरातील कुर्ला, घाटकोपर, सकिनाका मालाड सबवे, अंधेरी, ठाणे येथील सखल भागात पाणी भरण्यास सुरवात झाली आहे. 

हिंदमाता, सायन परिसरात पाणी साचल्याने वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. मरोळ जंक्शन भवानीनगर येथे कारवर झाड कोसळले. सकाळ पासून कोसळणाऱ्या पावसाची कुलाबा 10 मीमी, पूर्व उपनगर 58 मीमी, पाश्चिम उपनगरात 28 मीमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.

WebTitle : marathi news mumbai rains goregon tree collapse traffic jam

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com