पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई; महापालिकेचे 273 कोटी पाण्यात 

वैदेही काणेकर
शनिवार, 29 जून 2019

मुंबईत तब्बल महिनाभर उशिरानं वरूणराजानं हजेरी लावली. पण पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई झाली. या पावसात मुंबई महानगर पालिकेच्या कामांचे दावे कसे फोल आहेत हे उदाहरणासहित स्पष्ट झालं. अगदी करून दाखवलं म्हणणाऱयांचे दावे पावसानं बुडवून दाखवलं. नालेसफाई, पाणी उपसणारे पंप, रस्ते, वृक्षछाटणी, खड्डे बुजवण्यासाठीचे कोल्डमिक्स या कामांसाठी मुंबई महानगरपालिकेनं तब्बल 273 कोटी रुपये खर्च केले. 

मुंबईत पाणी तुंबू नयेसाठी यासाठी पालिकेनं : 

  • 295 पंप लावले त्यावर 55 कोटी रूपये खर्च करण्यात आले. तर
  • 238 किलोमिटरच्या नालेसफाईवर 153 कोटी खर्च करण्यात आला. 
  • 2 वर्षांच्या वृक्ष छाटणीसाठी - 117 कोटी 
  • खड्डे दुरुस्तीसाठी 1500 टन कोल्डमिक्स वापण्यात आलं त्यावर 15.86 कोटी रूपये खर्च करण्यात आले. 

एव्हढा सगळा खर्च करूनही अखेर महापालिकेचं पितळ उघडं पडलंय. पण तरीही महापौर मात्र पाणी तुंबलं नाहीच असा दावा करतायेत. 

यंदा मुंबईत पाणी तुंबणार नाही असा दावा करणाऱ्या मुंबई महानगर पालिकेला या पावसानं मात्र तोंडावर पडलाय. याच पावसात लो लाईन एरियाजमधलं पाणी काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात पंप बसवण्यात वाले असले तरी यंदा नव्यानेही काही भागात पाणी तुंबल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे कामाबाबत करून दाखवलं म्हणणाऱ्यांनी मुंबईत पाणी भरून दाखवलं अशी टीका आता होऊ लागलीय.

Webtitle : marathi news mumbai rains mumbai municipal corporation spent 273 cr to prevent monsoon water logging

संबंधित बातम्या

Saam TV Live