मुंबईत पावसामुळे विजेचा शॉक लागून तिघांचा मृत्य

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 28 जून 2019

मुंबईला सकाळ पासूनच पावसाने अक्षरशा झोडपून काढले असून पावसामुळे विजेचा शॉक लागून तिघांचा मृत्य झाला आहे तर दोघे जण अत्यवस्थ आहेत,त्यांच्यावर ट्रॉमा केअर रुग्णालयावर उपचार सुरू आहेत.

पहिली घटना अंधेरी पश्चिम येथील आरटीओ कार्यालयाजवळ घडली आहे. या परिसरात साचलेल्या पावसाच्या पाण्यातून काशिमा युडियार ही ६० वर्षीय महिला जात असताना तिला विजेचा शॉक लागला. या महिलेला नजीकच्या कूपर रुग्णालयात नेलं असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

दुसरी घटना ही गोरेगाव पूर्व मधील दुर्गा माता मंदिराजवळ घडली आहे. आज सकाळी या रिसरातून जात असताना चौघा जणांना विजेचा शॉक लागून ते जखमी झाले. जखमींना अग्निशमन दलाच्या जवानांनी ट्रॉमा सेंटर रुग्णालयात नेले असता यातील राजेंद्र यादव(वय ६०) आणि संजय यादव (वय २४)  यांना मृत घोषित करण्यात आले. 

दरम्यान, आशादेवी यादव (वय ५ ) आणि  दिपू यादव ( वय २४)  हे दोघे जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

WebTitle : marathi news mumbai rains three died due to electricity shock 

संबंधित बातम्या

Saam TV Live