उद्धव ठाकरेंच्या शपथविधीचं 'भाऊ' राज ठाकरेंना निमंत्रण

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 27 नोव्हेंबर 2019

मुंबई : मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेले असतानाच आता शपथविधीची तयारी सुरू झाली आहे. महाविकासआघाडीचा शपथविधी उद्या (ता. 28) पार पडेल. पण उद्धव ठाकरेंच्या या शपथविधी सोहळ्याला राज ठाकरे उपस्थित राहणार का हाच सगळीकडे चर्चेचा विषय ठरला आहे. शिवसेनेने त्यांच्याकडून राज ठाकरेंना निमंत्रण दिले आहे. आता ते शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहतात का याकडे सगळ्यांचे लक्ष असेल. 

Image result for raj thackeray uddhav thackeray

राज ठाकरेंनी शिवसेनेतून बाहेर पडत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. तेव्हापासूनच उद्धव व राज या भावांमध्ये धुसफूस सुरू आहे. घरातील या वादामुळे अनेक गैरसमज पसरवले गेले. आता मात्र उद्धव ठाकरेंच्या या आनंदाच्या क्षणी राज उपस्थित राहतात का हे बघणे औत्सुक्याचे असेल. 'आम्ही सर्वांना निमंत्रण देऊ राज ठाकरे आले तर आम्हाला आनंदच होईल,' असे शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी सांगितले. त्यामुळे राज ठाकरे कुटूंबियांसह उद्धव ठकरेंच्या शपथविधी सोहळ्याला हाजेरी लावण्याची शक्यता आहे. तसेच राज यांचा बंगला कृष्णकुंज हा शिवतीर्थाशेजारीच असल्याने ते शपथविधीला येण्याची दाट शक्यता आहे.  

Image result for raj thackeray uddhav thackeray

मनसेच्या मनसेच्या राजू पाटलांना मिळणार मंत्रीपद?
मनसेचे निवडून आलेले एकमेव आमदार राजू पाटील यांनाही राष्ट्रवादीच्या कोट्यातून राज्यमंत्री मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. लोकसभा निवडणूकीपासूनच राज ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला होता. राष्ट्रवादीसोबत मनसेचे चांगले संबंध जुळले होते. विधानसभा निवडणूकीतही त्यांनी एकमेकांना सहकार्य केले. आता महाविकासआघाडीमुळे मनसेचा पाठिंबा शिवसेनेला मिळेल अशी चर्चा सुरू आहे. 

शिवतीर्थावर होणाऱ्या उद्याच्या शपथविधीसाठी आजपासूनच जय्यत तयारी सुरू झाली आहे. शिवसेना व महाविकासआघाडीचे कार्यकर्ते आजपासूनच तयारीला लागले आहेत. अनेक राजकीय दिग्गज या शपथविधीला उपस्थित होणार आहेत. सोनिया गांधी, अमित शहा व इतर राज्यांचे मुख्यमंत्री या सोहळ्याला उपस्थित राहतील अशी माहिती आहे.    

Web Title: Raj Thackeray invited for Uddhav Thackeray s Oath taking ceremony

संबंधित बातम्या

Saam TV Live