राज ठाकरेंनी केले केतकी चितळेचे कौतुक

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 22 जून 2019

मुंबई - सोशल मीडियावरील ट्रोल्सना ज्याप्रकारे तू रोखठोक उत्तर दिले, त्यामुळे अनेक दबलेल्या आवाजांना व्यक्त होण्यासाठीची तू हिंमत दिलीस, त्याबद्दल तुझे अभिनंदन! अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अभिनेत्री केतकी चितळेचे कौतुक केले.

केतकी चितळेवर काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावरील ट्रोल्सनी अत्यंत घाणेरड्या शब्दांत टीका केली होती. त्या टीकेला केतकीने एका व्हिडिओ पोस्टद्वारे अत्यंत रोखठोक उत्तर दिले. मनसेच्या सरचिटणीस शालिनी जितेंद्र ठाकरे यांच्यासोबत केतकी आज सकाळी राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज निवासस्थानी आली होती. "राज ठाकरे यांनी माझे अभिनंदन करण्यासाठी मला बोलावले होते,' असे केतकीने प्रसारमाध्यमांना सांगितले.

'सोशल मीडियावरील महिलांशी मतभेद झाल्यावर काही जण अत्यंत घाणेरड्या शब्दांत महिलांवर टीका करतात. दुर्दैवाने, आजही महिलांच्या मतांचा, तसेच त्यांच्या वैयक्तिक प्रतिष्ठेचा आदर करण्याची वृत्ती समाजात, विशेषतः सोशल मीडियात दिसत नाही. महिलांवर बीभत्स शब्दांत टीका करणाऱ्यांना केतकीने जे रोखठोक उत्तर दिले आहे, ते निश्‍चितच कौतुकास्पद आहे,'' असे मत शालिनी ठाकरे यांनी व्यक्त केले.

Web Title: Raj Thackeray to Ketki Chitale Congratulation

संबंधित बातम्या

Saam TV Live