VIDEO | या महिला पोलिसाचा धमाल डान्स पाहिलात..

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2019

बीकानेर (राजस्थान) : एका महिला पोलिस कर्मचाऱयाने केलेल्या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. काम बाजूला ठेवा पण पोलिसाचा डान्स पाहाच, अशा प्रतिक्रिया नेटिझन्स देत आहेत.

बीकानेर (राजस्थान) : एका महिला पोलिस कर्मचाऱयाने केलेल्या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. काम बाजूला ठेवा पण पोलिसाचा डान्स पाहाच, अशा प्रतिक्रिया नेटिझन्स देत आहेत.

हरियाणात बोलल्या जाणाऱ्या 'या गजबन पानी ने...' गाण्यावर डान्स केला आहे. महिला पोलिसाचे नृत्य पाहून अनेकजण पैसे ओवाळताना दिसत आहेत. मनापासून नृत्य करणाऱया महिला पोलिसाला नेटिझन्सनी दाद दिली आहे. शिवाय, त्यांच्यावर कौतुकाचा वर्षावही केला आहे.

दरम्यान, पोलिसांच्या खानावळीमध्ये जेवण तयार करणाऱ्या पुना देवी या महिलेच्या घरी लग्नसमारंभ होता. पोलिस कर्मचाऱ्यांनी मिळून 1 लाख 61 हजार रुपये वर्गणी गोळा करत मावशींना दिले. शिवाय, सर्वजण आनंद सोहळ्यामध्येही सहभागी झाले होते. यावेळी अनेकांनी नृत्य करत आनंद द्विगुणीत केला. या सोहळ्याची चर्चा परिसरात रंगली आहे.

Web Title: rajsthan police woman cop seen dancing in wedding party bikaner
 
संबंधित बातम्या

Saam TV Live