VIDEO | 6 राशींच्या लोकांसाठी धोक्याची घंटा ? शनीचा प्रकोप होणार ?

संदीप चव्हाण
रविवार, 8 डिसेंबर 2019

17 दिवसानंतर शनीचा प्रकोप होणार असल्याचा दावा सोशल मीडियावर केला जातोय. 6 राशीच्या लोकांसाठी ही धोक्याची घंटा असल्याचा मेसेज व्हायरल होतोय.

17 दिवसानंतर शनीचा प्रकोप होणार असल्याचा दावा सोशल मीडियावर केला जातोय. शनीचा प्रकोप झाल्यास साडेसाती सुरू होईल अशी भीती लोकांच्या मनात निर्माण झालीय. व्हायरल मेसेजमध्ये 6 राशीच्या लोकांसाठी ही धोक्याची घंटा असल्याचा दावा केलाय. त्यामुळं खरंच हा मेसेज खरा आहे का? शनीचा प्रकोप झाल्यास साडेसाती सुरू होते का.? असे अनेक प्रश्न उपस्थित होतायत.

हा मेसेज व्हायरल होत असल्यानं याची आम्ही सत्यता जाणून घेण्याचा प्रयत्न केला. वृषभ,मिथुन, कर्क, कन्या, मकर, धनु राशीच्या लोकांना याचा फटका बसेल असा दावा केलाय. पण, खरंच शनिमुळे राशीच्या लोकांना साडेसातीसुरू होते का.? याबद्दल अधिक माहिती जोतिशी अभ्यासकांकडून जाणून घेतली.

शनी त्यांच्या मूळ राशीत जरी असला तरीदेखील प्रत्येक राशीला शनी चांगला आहे. ज्यांना काम नाही त्यांना काम मिळेल लोकांनी घाबरून जाऊ नये असं मत जोतिशी अभ्यासकांनी व्यक्त केलंय. पण,हे होतं की ही अंधश्रद्धा आहे याबद्दल अधिक माहिती अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकाऱ्यांकडून जाणून घेतलं. 

लोकांना घाबरवण्यासाठी असे मेसेज व्हायरल करत असल्याचं सांगत हे अंधश्रद्धेला खतपाणी घालत असल्याचं बोललं जातंय. शनि मार्गस्थ होत जरी असला तरी घाबरू जाऊ नये असं आवाहन करण्यात आलंय. त्यामुळं आमच्या पडताळणीत शनिच्या चालीमुळं साडेसाती सुरू होईल हा दावा असत्य ठरला.


संबंधित बातम्या

Saam TV Live