समृद्धी महामार्गाला देण्यात येणार यांचं नाव

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 11 डिसेंबर 2019

मुंबई आणि नागपूरला जवळ आणणाऱ्या समृद्धी महामार्गाबाद्द्ल एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय. राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. राज्य मंत्रिमंडळात समृद्धी महामार्गाला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्यावर जवळपास शिकामोर्तब झालाय. हा महामार्ग मुंबई ते नागपूरला जोडणारा महत्त्वाचा महामार्ग मानला जातोय.

मुंबई आणि नागपूरला जवळ आणणाऱ्या समृद्धी महामार्गाबाद्द्ल एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय. राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. राज्य मंत्रिमंडळात समृद्धी महामार्गाला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्यावर जवळपास शिकामोर्तब झालाय. हा महामार्ग मुंबई ते नागपूरला जोडणारा महत्त्वाचा महामार्ग मानला जातोय.

भाजपच्या शाळेचे आम्ही हेडमास्तर! राज्यसभेत राऊतांची सडेतोड टोलेबाजी

आज पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याचा प्रस्ताव एकनाथ शिंदे यांनी ठेवला. या मागणीवर सर्वांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्यामुळे लवकरात लवकर समृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव देण्याबाबत कार्यवाही होणार आहे.   

पंकजा मुंडे भाजपला सोडचिठ्ठी देणार? उद्या गोपीनाथ गडावर स्पष्ट करणार भूमिका

"समृद्धी महामार्गाचं काम येत्या तीन वर्षात पूर्ण होणार आहे. दरम्यान समृद्धी महामार्ग हा महाराष्ट्रात गेमचेंजर ठरणार आहे. या महामार्गामुळे नागपूर आणि मुंबई जवळ येणार आहेत. या महामार्गामुळे महाराष्ट्रात विकास व्हायला मदत होणार आहे", असं मत शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलंय. 

समृद्धी महामार्गाबाबत थोडक्यात 
समृद्धी महामार्ग हा तब्बल  ७०१ किमी लांबीचा आठ पदरी महामार्ग  असणार आहे. 
हा महामार्ग महाराष्ट्राची राजधानी मुंबई ते महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरला जोडणार आहे. 
हा महामार्ग महाराष्ट्रातील 10  जिल्ह्यातून, 26 तालुक्यांतून आणि 390  गावांमधून जाणार आहे
या महामार्गामुळे नागपूर आणि मुंबईमधील प्रवास ८ तासात पूर्ण करता केणार आहे 
या प्रकल्पासाठी 46 हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे 
या महामार्गासाठी आठ हजार सहाशे तीन हेक्टर जमिनीची गरज आहे

गेल्या अनेक दिवसांपासून समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्यात यावं, यासाठी शिवसेना पुढाकार घेत असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. आता लवकरात लवकर समृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव देण्याबाबत कार्यवाही होणार असल्याने शिवसेनेची मागणी पूर्ण होताना पाहायला मिळतेय. 

Webtitle : Samruddhi Highway Will Take New name, This Decision Will In State Cabinit 


संबंधित बातम्या

Saam TV Live