शिवसेनेचे ज्येष्ठ नेते म्हणतात कोण म्हणत शिवसेना भाजप एकत्र येणार नाही

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 10 डिसेंबर 2019

भाजप सोबतची युती तोडत शिवसेनेने कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस सोबत घरोबा केलाय. अशातच शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी एक मोठं वक्तव्य केलंय. हे वक्तव्य आहे शिवसेना आणि भाजपच्या पॅचअप संदर्भात. शिवसेना आणि भाजप कधीही एकत्र येऊ शकतात असं मनोहर जोशी यांनी म्हटलंय. 

छोट्या मोठ्या गोष्टींवरून झगडा करण्यापेक्षा काही सहन करावं, काही गोष्टी एकमेकांना सांगाव्यात. असं मनोहर जोशी म्हणालेत. महाविकास आघाडीबद्दल देखील मनोहर जोशी यांनी वक्तव्य केलंय. तिघांनी एकत्र काम केलं तर फायद्याचं ठरेल, असं जोशी म्हणालेत.

मुंबईत टकटक गँगचा धुमाकूळ...

दरम्यान मनोहर जोशी यांनी ANI सोबत बोलताना शिवसेना आणि भाजपच्या संबंधांबद्दल देखील टिप्पणी केलीये. 

2020 मुंबईसाठी घरस्वस्ताईचं! मुंबईत घर घेण्याचं स्वप्न

जेंव्हा कुणालाही बहुमत मिळत नाही, तेंव्हा अशा गोष्टी घडतात. असंच सध्या शिवसेना आणि भाजपच्या बाबतीत झालंय. पण याचा अर्थ आम्ही भाजप सोबत कधीच जाणार नाही असा नाही. योग्यवेळी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे योग्य भूमिका घेतील. अशी खात्री मनोहर जोशी यांनी बोलून दाखवली आहे.

मनोहर जोशींच्या या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्यात. त्यामुळे येत्या काळात महाराष्ट्रातील राजकारणातील 'पुराने दोस्त' परत येतील का हे पाहणं महत्त्वाचं असेल. 

WebTitle : senior shivsena leader said who said we will never come together with BJP 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live