सरकारच्या हुकुमशाहीला गांधीजींच्या अहिंसेने उत्तर देवू - शरद पवार

Sharad Pawar, Mahatama Gandhi Peace Rally
Sharad Pawar, Mahatama Gandhi Peace Rally

मुंबई : सरकार हुकुमशाही नीती वापरत आहे. 'जेएनयू' मध्ये जे काही झाले ते योग्य नव्हते त्यामुळे संपुर्ण देशात विरोध होत आहे.सरकारच्या हुकुमशाहीला गांधीजींच्या अहिंसा तत्वाने उत्तर द्यायला हवे असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी महात्मा गांधी शांती यात्रेला हिरवा कंदील दाखवताना व्यक्त केले.

आज केंद्रीय माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी महात्मा गांधी शांती यात्रेचे आज गेट वे ऑफ इंडिया येथून आयोजन केले होते. ही यात्रा ३१ जानेवारीला दिल्लीतील राजघाटावर पोचणार आहे. या गांधी शांती यात्रेला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी हिरवा कंदील दाखवला. 

''सीएए' आणि 'एनआरसी' बाबत देशातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. कागदपत्र नसतील तर लोकांना भीती आहे की सरकारकडून त्यांना सरकारने निर्माण केलेल्या कॅंपमध्ये रहावे लागेल अशी परिस्थिती सरकारने निर्माण केली आहे.देशात आज जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे देशातील जनता सरकारवर नाराज आहे. या कारणामुळे मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर उतरत आहे.या लोकांना चांगला रस्ता दाखवण्याची गरज आहे आणि त्यासाठी महात्मा गांधींजींचा अहिंसा तत्त्वाचा मार्ग असून यामुळे संविधान वाचवू शकतो,'' असे शरद पवार यावेळी म्हणाले. या आंदोलनाला शांततेचा मार्ग आवश्यक आहे. मला आनंद आहे की,यशवंत सिन्हा त्याच रस्त्यावर आहेत. या शांती यात्रेत मोठ्या प्रमाणात लोक सहभागी होणार आहेत, असेही पवार म्हणाले.

या महात्मा गांधी शांती यात्रेला माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा, राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि मुंबई अध्यक्ष नवाब मलिक, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रकाश आंबेडकर,  माजी खासदार भालचंद्र मुणगेकर, माजी मंत्री शशिकांत शिंदे, आमदार विद्या ताई चव्हाण आणि मुंबईतील पदाधिकारी व कार्यकर्ते आणि मुंबईकर उपस्थित होते.
    

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com