शिवसेना शेतकऱ्यांसाठी उभारणार पीकविमा योजना मदत केंद्र

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 15 जून 2019

मुंबई - राज्यात अनेक ठिकाणी दुष्काळ जाहीर झाला असला, तरी अनेक शेतकरी पीकविमा योजनेच्या लाभापासून वंचित आहेत. या शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी शिवसेनेकडून 19 जून या पक्षाच्या वर्धापन दिनापासून 34 जिल्ह्यांत तालुका स्तरावर प्रत्येकी एक पीकविमा योजना मदत केंद्र उभारण्यात येईल, असा निर्णय शुक्रवारी घेण्यात आला.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेना भवन येथे सर्व जिल्हाप्रमुखांची बैठक आज झाली. त्या वेळी हा निर्णय घेण्यात आला. खात्यात क्रमांक चुकला म्हणून 10 हजार लोकांना विम्यापासून वंचित राहावे लागले. सरकार व केंद्र यांच्यात ताळमेळ नसल्याचा फटका नागरिकांना बसत आहे.

या विरोधात शिवसेनेने आवाज उठवल्यावर आठ हजार 500 लोकांना विमा मिळाला. त्यानंतर संबंधित केंद्राने  अंशदान देण्याचे कबूल केले आहे. "इफ्को टोकियो ही खासगी कंपनी विमा पुरवीत आहे. या विरोधात शेतकरी रोज येऊन तक्रार मांडत आहेत. आम्ही सरकारविरोधात नसून संबंधित कंपनीविरोधात आवाज उठवत असल्याचे शिवसेनेकडून स्पष्ट करण्यात आले. 

Web Title: Shiv Sena aggressive Regarding crop insurance

संबंधित बातम्या

Saam TV Live