शिवबंधन तोडून अभिनेता अमोल कोल्हे यांचा शिवसेनेतून राष्ट्रवादीत प्रवेश

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 1 मार्च 2019

मुंबई- शिवसेना नेते आणि प्रसिद्ध अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवबंधन तोडून आज ता.(01) राष्ट्रवादीचे घड्याळ हातावर बांधले आहे. त्यांनी आज राष्ट्रवादीचे नेते अजित पवार प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीला आणि विधानपरिषद विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. कोल्हे हे शिरूर लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार व विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढविण्याची शक्यता आहे.

कोल्हे हे स्वतः शिरूर लोकसभा मतदारसंघातील आहेत. त्यामुळे आढळराव यांच्याविरोधात ते चांगली लढत देऊ शकतील, असा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचा होरा आहे. शिरूरमध्ये तगडा उमेदवार राष्ट्रवादीला मिळत नव्हता. तो कोल्हे यांच्या रूपाने मिळाल्याची भावना आहे.

कोल्हे हे शिवसेनेचे नेते होते. त्यांच्याकडे पुणे जिल्ह्याची जबाबदारी पक्षाने दिली होती. मात्र महापालिका निवडणुकीत शिवसेनेची वाताहत झाल्याने त्यांनी या जबाबदारीचा राजीनामा दिला होता. शिरूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून विलास लांडे, मंगलदास बांदल यांची नावे चर्चेत असताना थेट अभिनेत्याचे नाव पुढे आल्याने राष्ट्रवादीतही चर्चा सुरू झाली आहे.

यावेळी धनंजय मुंडे यांनी ट्विट करत म्हटले आहे की, स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतून जनतेच्या मनावर राज्य करणारे अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन! आमचे मित्र डॉ. कोल्हे यांना त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा.

Web Title: Shivsena Leader Amol Kolhe Will Join NCP

संबंधित बातम्या

Saam TV Live