भाजपच्या जबरदस्त खेळीनं शिवसेना थंडगार;  मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंना दाखवला कात्रजचा घाट

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 2 सप्टेंबर 2018

काँग्रेस-राष्ट्रवादी हे विरोधक आक्रमक झाले असताना भाजपनं शिवसेनेसाठी जुळवून घेतल्याचं चित्र होतं. पण हे चित्र भ्रामक असल्याचं हाजी अराफात शेख यांच्या भाजप प्रवेशानं सिद्ध झालंय.

मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी रात्री महामंडळाच्या घोषणा केल्या. यात हाजी अराफत यांना अल्पसंख्याक आयोगाचं अध्यक्षपद देण्यात आलं. अराफत यांना दिलेल्या पदाबाबत शिवसेनेतून आश्चर्य व्यक्त होत असताना शनिवारी रात्री अराफत यांनी गुपचूप भाजप प्रवेशाचा कार्यक्रम उरकला.

गेल्या काही दिवसांपासून शिवसेना-भाजपशी जुळवून घेण्य़ाच्या मानसिकतेत होती. अमित शहांच्या मातोश्री भेटीनंतर मवाळ झालेल्या शिवसेनेला भाजपनं डिवचण्याचं काम केलंय.

निवडणुका कधीही जाहीर होण्याची शक्यता आहे. अशावेळी भाजपनं शिवसेनेला डिवचण्याचं काम केलंय. अराफात यांच्या भाजपप्रवेशाचे पडसाद आगामी राजकारणात उमटण्याची शक्यता आहे.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live