उद्धव ठाकरेंनी नकार दिल्यास मुख्यमंत्रीपदासाठी 'या' नेत्यांच्या नावांची चर्चा

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2019

मुंबई : महाराष्ट्रातील जनतेला उदधव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेले बघायचे आहे, अशी भूमिका शिवसेनेतील निष्ठावंतांनी मांडली असली तरी त्यांनी नकार दिल्यास आमदारांचे पाठबळ असलेले एकनाथ शिंदे किंवा सेनेला सत्तासोपानापर्यंत पोहोचवणारे संजय राऊत यांची नावे या पदासाठी घेतली जात आहेत. 

साम टीव्हीचं व्हॉट्सऍप बुलेटीन

एकनाथ शिंदे यांची विधीमंडळ नेतेपदी निवड झाली आहे. त्यातच ते आमदारांशी सतत संपर्क ठेवून असतात. त्यामुळे मातोश्रीने हिरवा कंदिल दाखवला तर त्यांना महाराष्ट्राचे प्रमुखपद मिळू शकेल. त्यातच भाजपकडून नव्या आघाडीकडे जाण्याच्या कालावधीत अत्यंत मोलाची भूमिका बजावणाऱ्या संजय राऊत यांचेही नाव पुढे आले आहे. मात्र, त्यांच्या नावाला ते राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जवळचे असल्याने विरोध होण्याची शक्‍यता आहे. 

उदधव ठाकरे यांना अत्यंत विश्‍वासू आणि जवळचे वाटणाऱ्या सुभाष देसाई यांचे नाव अचानक पुढे येवू शकते असे मानणारा मोठा वर्ग आहे. ते सर्वसहमतीचे आणि विशेषत: उदधव ठाकरे यांच्या पसंतीचे नाव ठरू शकेल.

भाजपची शिवसेनेला मुख्यमंत्रिपदाची नवी ऑफर!

रविवारी शपथविधी?
दरम्यान येत्या रविवारी शपथविधी झाल्यास तो सेनेच्या वाटचालीसाठी अत्यंत चांगला दिवस असेल असे सांगण्यात येते आहे.

Web Title : Shivsena Leaders Sanjay Raut And Eknath Shinde Those Two Will Be Chief Minister ?

संबंधित बातम्या

Saam TV Live