मुंबईत शिवसेना-मनसे कार्यकर्ते भिडले 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 26 जुलै 2018

लोअर परेल पुलाच्या पाहणी दौऱ्या दरम्यान उड्डाणपुलावर शिवसेना आणि मनसेचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. पुलाच्या पाहणी दौऱ्यात मनसे कार्यकर्त्यांनी घुसखोरी केल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. पोलिसांनी मध्यस्थी करुन हे प्रकरण वेळीच शांत केले.

वरळी भागातील शिवसेना आमदार सुनिल शिंदे आणि मनसेचे माजी नगरसेवक संतोष धुरी लोअर परेलच्या उड्डाणपुलावर रेल्वे पालिका अधिकाऱ्यांसह पुलाच्या पाहणीसाठी आले होते. त्यावेळी दोघांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना धक्काबुक्की-शिवीगाळ केल्याची माहिती आहे. त्यानंतर उड्डाणपुलावरच शिवसेना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला.   

महापालिका, रेल्वे अधिकारी या उड्डाणपुलाची पाहणी करण्यासाठी जाणार होते. त्यावेळी आमदार सुनिल शिंदेही उड्डाणपुलाची पाहणी करण्यासाठी गेले. मात्र अरुंद वाट असल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली. मनसेच्या कार्यकर्त्यांनी आपल्या दौऱ्यात घुसखोरी केल्याचा आरोप शिवसेनेच्या वतीने करण्यात आला आहे.

लोअर परेलचा रेल्वे पूल मंगळवार (24 जुलै) पासून वाहतूक आणि पादचाऱ्यांसाठी बंद करण्यात आला. त्यामुळे लोअर परेल रेल्वे पुलाजवळ नागरिकांची गर्दी होऊन गोंधळाचं वातावरण आहे.

संबंधित बातम्या

Saam TV Live