शिवसेनेचे खासदार घेणार मराठीत शपथ

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 30 मे 2019

मुंबई - नव्याने निवडून आलेल्या खासदारांनी संसदेत मराठी भाषेत शपथ घेण्याचे आवाहन सोशल मीडियावरून करण्यात आल्यानंतर शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह काही खासदारांनी मराठीत शपथ घेण्याचे ठरविले आहे. त्यामुळे अन्य खासदारांवरही दबाव वाढला असून, राज्यातील किती खासदार नेटकऱ्यांना प्रतिसाद देतात याकडे लक्ष लागले आहे.

यंदाच्या निवडणुकीत विजयी झालेले शिवसेनेचे सर्व खासदार मराठीतून शपथ घेणार आहेत. कल्याणचे नवनिर्वाचित खासदार श्रीकांत शिंदे यांनी ही माहिती दिली आहे. खासदार म्हणून निवडून आल्यानंतर श्रीकांत शिंदे यांनी डोंबिवलीत प्रथमच मतदारांची भेट घेतली. या वेळी बोलताना त्यांनी शिवसेनेचे सर्व खासदार मराठीतून शपथ घेणार असल्याची माहिती दिली. दरम्यान, सोशल मीडियावर #मराठीत शपथ या हॅशटॅगखाली ट्रेण्ड होत असून, महाराष्ट्रातील सर्व नवनिर्वाचित खासदारांनी मराठीत शपथ घ्यावी, अशी मागणी होत आहे.

Web Title: Shivsena MP Oath in Marathi Delhi Politics

संबंधित बातम्या

Saam TV Live