VIDEO | वर्षा बंगल्याच्या मजकुरावरून संजय राऊतांचा प्रहार

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 28 डिसेंबर 2019

मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान म्हणजे वर्षा बंगला. याच वर्षा बंगल्यात Who is UT, UT Is Mean, Shut Up असे मजकूर लिहिलेले आढळलेत. वर्षा बंगल्यातील भिंतींवरील हे मजकूर समोर आल्यानंतर आता राज्यातलं राजकारण चांगलंच रंगलंय.

मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान म्हणजे वर्षा बंगला. याच वर्षा बंगल्यात Who is UT, UT Is Mean, Shut Up असे मजकूर लिहिलेले आढळलेत. वर्षा बंगल्यातील भिंतींवरील हे मजकूर समोर आल्यानंतर आता राज्यातलं राजकारण चांगलंच रंगलंय.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी वर्षा बंगला सोडलाय. महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अद्याप तिथं राहायला गेलेले नाहीत. मात्र, त्याआधीच वर्षा बंगल्यातील रंगलेल्या भिंतींचा हा व्हिडिओ व्हायरल झालाय.

Image may contain: indoor

या भिंतींवर Who is UT, UT Is Mean, Shut Up  याच बरोबर देवेंद्र फडणवीस रॉक्स (Devendra Fadanavis Rocks), भाजप (BJP) असं देखील लिहण्यात आलंय. आता यातील यूटी म्हणजे नेमकं कोण? यावरून तर्कवितर्क लावले जातायेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावाचं इंग्रजीतील संक्षिप्त रूप यूटी (UT) असं होतं. त्यामुळे हे लिखाण त्यांना उद्देशून असावं अशीही चर्चा आहे.

No photo description available.

No photo description available.

दरम्यान या घटनेवरून शिवसेनेचे खासदार आणि फायर ब्रॅंड नेते संजय राऊतांनी सदर लिखाणावर जोरदार टीका केलीय. वर्षा बंगल्यात मी अजूनही गेलेलो नाही, असे मजकूर रंग मारून मिटवता येतात, मात्र ज्यांनी ते लिहिलंय त्यांचं तोंड मात्र काळं झालं आहे अशी खरमरीत टीका संजय राऊत यांनी केलीये.   

दरम्यान वर्षा बंगल्याच्या भिंतींवरील त्या लिखाणावर मुंबईच्या महापौर यांनी देखील प्रतिक्रिया दिलीये.  'जे काही झालंय ते त्यांच्या कर्माने झालंय' असं म्हणत, भिंतींवरील मजकुरावर मुख्यमंत्री पद गेलंय त्याला जबाबदार तुम्हीच आहात असं मुंबई महापौर किशोरी पेडणेकर म्हणालेत. 

WebTitle : shivsena MP sanjay rauts take on gratify on the walls of varsha bungalow


संबंधित बातम्या

Saam TV Live