Netflix | 'मिर्झापूर'नंतर 'या' नवीन वेबसिरीजमध्ये श्रिया-अली फजल पुन्हा एकत्र...

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 21 नोव्हेंबर 2019

श्रिया पिळगावकर नेहमीच वेगवेगळ्या आणि मोजक्या भूमिका करताना दिसते. 'मिर्झापूर' वेबसिरीजमध्ये तिने महत्त्वाची भूमिका साकारली होती. चित्रपट न करता वेबसिरीजकडे वळलेली श्रिया पुन्हा चित्रपटात येईल की वेबसिरीजमध्ये काम करेल असा प्रश्न सर्वांना पडला होता.

पण, श्रिया पुन्हा एकदा नेटफ्लिक्सवरच्या एका चित्रपटात मुख्य भूमिका करत आहे. 'हाऊस अरेस्ट' असं या चित्रटाचं नाव आहे. 15 नोव्हेंबरला हा चित्रपट नेटफ्लिक्सवर रिलीज झाला. 

'हाऊस अरेस्ट'मध्ये श्रियाने एका पत्रकाराची भूमिका केली. या चित्रपटात श्रियासोबत पुन्हा एकदा असले अली फजल. करण (अली फजल) नावाच्या तरूणाने अनेक दिवस स्वतःला कोंडवून घेतले आहे. त्याचे मित्र-मैत्रिणी त्याला यातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करतात. तो मात्र कोणाचंही ऐकत नाही. करण घरातली कामं करण्यात अत्यंत कुशल असतो, मात्र घरातून बाहेर न पडण्याचे कारण कोणाला सांगत नसतो. अशात त्याच्या घरी येते सायरा (श्रिया पिळगावकर). सायरा एक तरूण, धडाडीची पत्रकार असते. तिला करणच्या अशा घरात कैद करून घेण्याच्या सवयीचे नवल वाटते व ती त्या इंटरव्ह्यू घेण्यासाठी थेट त्याच्या घरी पोहोचते. त्याचं बंद घरातलं आयुष्य बघते, त्याच्यात मिक्स होते, त्याच्या मनातलं जाणून घेते... या सगळ्यात त्या दोघांची चांगली मैत्री होते. या दोघांची 'हाऊस अरेस्ट'मधली केमिस्ट्री बघण्यासारखी आहे.

श्रिया सांगते, की तिला 'हाऊस अरेस्ट'ची स्क्रिप्ट खूप आवडली होती. त्यात मिर्झापूरमध्ये एकत्र काम केल्याने अली फजल आणि तिची केमिस्ट्री चांगली जमून आली होती. त्यामुळे तिने या चित्रपटात काम करण्याचा निर्णय घेतला.

Web Title: Shriya Pilgaonkar plays Journalist role in House Arrest Movie

संबंधित बातम्या

Saam TV Live