मुंबईतलं सिद्धिविनायक मंदिर उडवण्याची धमकी ; ठाण्याच्या मॉलमध्ये सापडलं धमकीचं पत्र

मुंबईतलं सिद्धिविनायक मंदिर उडवण्याची धमकी ; ठाण्याच्या मॉलमध्ये सापडलं धमकीचं पत्र

मुंबईतलं सिद्धिविनायक मंदिर म्हणजे लाखो भाविकांचं श्रद्धास्थान. दररोज इथं शेकडो भाविक गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी येत असतात. पण सकाळी अचानक एक धक्कादायक बातमी आली आणि सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला. ठाण्याच्या विवियाना मॉलमधल्या बाथरूममध्ये एका भित्तीपत्रावर धक्कादायक संदेश लिहण्यात आला होता. ज्यात सिद्धिविनायक मंदिर उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. 

या संदेशात "गजवा ए हिंद दादर सिद्धिविनायक मंदिर बूम" असा संदेश लिहिण्यात आलाय. तसंच दोन वेगवेगळे मोबाईल नंबर एका कागदावर पेनानं लिहून ते आजूबाजूला पसरवण्यात आले होते. या मेसेजनं पोलिस यंत्रणांची धावाधाव सुरू झाली. तपास सुरू झाला. तेव्हा त्यात एक वेगळंच वास्तव समोर आलं. एका एक्स बॉयफ्रेंडनं आपल्या तरूणीची बदनामी करण्यासाठी हा प्रकार केला होता. केतन घोडके असं या तरूणाचं नाव आहे. त्यानं आपला गुन्हा कबूल केलाय. 

काही दिवसांपूर्वीच अशाच एका मजनूभाईनं आपल्या एक्स प्रेयसीच्या पतीला बदनाम करण्यासाठी शालीमार एक्स्प्रेसमध्ये फटाके ठेवले होते. प्रेमप्रकरणातून दहशतवादी धमक्या देण्याचे प्रकार वाढू लागलेत. या प्रेमवीरांमुळे सारी यंत्रणाच कामाला लागतीय. त्यामुळे असे संदेश पसरवणाऱ्या रोमियोंना पोलिसांनी असा काही प्रेमाचा गुलगंद भरवावा की पुन्हा असं कृत्य करण्याची कुणाची हिम्मत होणार नाही.

WebTtle : marathi news mumbai siddhivinayak temple on the target of terrorist message found on the wall of the mall

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com