तुमची लाडकी लालपरी लागली भिकेला... कर्मचारी अडचणीत

नितीन सावंत
शनिवार, 14 डिसेंबर 2019

अवघ्या महाराष्ट्राची लालपरी म्हणजेच एसटी महामंडळाच्या एसटी बसचं चाक अडचणींच्या चिखलात सापडलंय. ही लालपरी इतकी गर्तेत सापडलीय की कर्मचाऱ्यांना पगार कसा द्यायचा हा प्रश्न महामंडळाला पडलाय.

अवघ्या महाराष्ट्राची लालपरी म्हणजेच एसटी महामंडळाच्या एसटी बसचं चाक अडचणींच्या चिखलात सापडलंय. ही लालपरी इतकी गर्तेत सापडलीय की कर्मचाऱ्यांना पगार कसा द्यायचा हा प्रश्न महामंडळाला पडलाय.

एसटी महामंडळाची 31 विभागांत 250 आगारं आहेत. मात्र त्यापैकी केवळ 70 आगारांचं उत्पन्न चांगलं आहे तर 180 आगारं तोट्यात आहेत. अवकाळी पावसामुळे प्रवासी संख्या घटली. महामंडळाची चुकीची धोरणं, विनाकारण केलेला खर्च, वातानुकूलित गाड्यांना महत्त्व देताना बिगर वातानुकूलित गाड्यांकडे केलेलं दुर्लक्ष, खासगी वाहतुकीकडे वाढलेला प्रवाशांचा कल आणि अवैध वाहतुकीला आळा घालण्यात आलेलं अपयश ही एसटी महामंडळ गाळात जाण्यामागची प्रमुख कारणं आहेत. एसटी महामंडळाला सतत तोटा सहन करावा लागतोय. इंधन, टायर, प्रवासी कर, पथकर यावरच्या वाढत्या खर्चामुळे एसटी महामंडळाचा तोटा पाच हजार कोटींवर जाण्याची भीती वर्तवली जातेय. 

मात्र, एसटी महामंडळाच्या अवस्थेचा परिणाम आता थेट वेतनावरच होऊ लागल्यानं कर्मचाऱ्यांचे हाल होतायत.एसटी महामंडळाच्या या बिकट अवस्थेमुळे कर्मचाऱ्यांचं कुटुंबाकडे दुर्लक्ष होतंय..त्यामुळे एका चिमुरडीनं आपल्या वडिलांची व्यथा मुख्यमंत्र्यांना कळवलीय.

एसटीच्या अनेक योजना सध्या रखडल्यात. महाराष्ट्राची शान असलेल्या लालपरीला पुन्हा एकदा गौरवाचे दिवस दाखवण्यासाठी नव्या सरकारला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल.

Web Title : St Mahamandal Bus Driver And Workers In trouble


संबंधित बातम्या

Saam TV Live